पितृपक्षाचा पंधरवडा हा सर्वपितृ अमावस्येने समाप्त होतो. यंदा ही अमावास्या 14 ऑक्टोंबर 2023 ला आहे. ही अमावस्या भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षात येते.
असे मानले जाते की, या दिवशी पितृ पक्ष संपतो आणि पितर पृथ्वी सोडतात. हिंदू धर्मात ही अमावास्या अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या दिवशी दान, तर्पण, श्राद्ध कर्म, ब्राह्मण मेजवानी मोठ्या प्रमाणात आयोजित केली जाते. असे केल्याने पितरांच्या आत्म्यांना शांती मिळते आणि त्यांना मोक्ष प्राप्त होतो.
शास्त्रानुसार, ज्या वंशजांना कोणत्याही कारणाने आपल्या पूर्वजांच्या प्रस्थानाची तारीख आठवत नाही, त्यांचे कार्य हे या दिवशी म्हणजे पितृ अमावस्येला श्राद्ध करू शकतात.
असे मानले जाते की, या दिवशी श्राद्ध केल्यास सर्व तिथींचे भोग प्राप्त होतात आणि पितर प्रसन्न होतात. ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक असेही सांगत आहेत की, या दिवशी विशिष्ट कालावधीत आवश्यक उपाय केल्यास लोकांना सर्वाधिक फायदा होईल.
सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी सकाळी ८ ते ११ या वेळेत सुक्या खोबऱ्यात छिद्र करून त्यात साखर , तांदूळ, मैदा यांचे मिश्रण भरावे. नंतर पिंपळाच्या झाडाजवळील खड्ड्यात गाडावे. नारळाचे फक्त छिद्र दिसत असल्याची खात्री करा. असे केल्याने सर्व कीटक ते खातात. असे मानले जाते की, हा उपाय केल्याने पितर संतुष्ट होतात आणि त्यांच्या वंशजांवर प्रसन्न होऊन त्यांना सुख-समृद्धीचा आशिर्वाद देतात.
पितृ पक्षामध्ये विविध प्राण्यांना अन्न दिल्याने अनेक फायदे होतात असेही सांगितले जाते. पौराणिक मान्यतेनुसार, भगवान विष्णू पीपळाच्या झाडात वास करतात. त्यामुळे हा उपाय अधिक फलदायी ठरतो.