वैदिक ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रह ठराविक वेळानंतर आपली रास बदलत असतात. शनिदेव सर्वात संथ गतीने तर चंद्रदेव सर्वात वेगाने एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करणार आहे. शनी ग्रह अडीच वर्ष एका राशीत राहतो तर चंद्र हा अडीच दिवस एका राशीत असतो. चंद्रदेव 10 ऑक्टोबरला कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करणार आहे. सिंह राशीत शुक्रदेव आधीपासून विराजमान आहे. त्यामुळे सिंह राशीत शुक्र आणि चंद्र यांचं मिलन होतं आहे. यातून कलात्मक योग निर्माण होतो आहे.
त्याशिवाय हिंदू पंचांगानुसार शुभ योग, साध्य योग आणि मघा नक्षत्राचा शुभ योग जुळून आला आहे. त्यामुळे 10 ऑक्टोबरचा दिवस आणि पुढील अडीच दिवस काही राशींसाठी वरदान असणार आहे. कुठल्या राशींवर शुकदेव आणि चंद्रदेव प्रसन्न होणार आहेत, पाहूयात.
मिथुन राशी
या राशीच्या लोकांसाठी कलात्मक योग अतिशय शुभ ठरणार आहे. या लोकांना आर्थिक फायदा होणार आहे. गुंतवणुकीसाठी हा काळ उत्तम असणार आहे. सामाजिक कार्यातून तुम्हाला मान सन्मान वाढणार आहे. व्यावसायिकांसाठीही हा योग प्रगती घेऊन आला आहे.
कन्या राशी
या राशीच्या लोकांसाठी या योग अतिशय लाभदायक ठरणार आहे. तुम्हाला धनलाभ होणार असून आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. कन्या राशीच्या लोकांसाठी हा योग अतिशय फलदायी ठरणार आहे. तुमचे अडकलेले पैसे परत मिळणार आहे. नवीन वस्तू खरेदीचा योग आहे. परदेशवारीचे स्वप्नही पूर्ण होणार आहे.
वृश्चिक राशी
या राशीसाठी हा योग फलदायी ठरणार आहे. तुमची धार्मिक कार्यात रुची वाढणार आहे. व्यवसायिकांसाठी हा काळ उत्तम असणार आहे. उत्पन्नात वाढ होणार असून व्यवसायची व्यापती वाढवणार आहात. सामाजिक कार्यात मन रमणार आहे. घरात तुमच्या मान वाढणार आहे. कामाच्या ठिकाणी कौतुक होणार आहे. तुमच्या कानावर आनंदाची बातमी पडणार आहे.
धनु राशी
या राशीच्या लोकांसाठी कलात्मक योग अतिशय लाभदायक ठरणार आहे. तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळणार आहे. पुढीच अडीच दिवसात तुम्हाला अनेक मार्गाने शुभवार्ता मिळणार आहे. आर्थिक लाभामुळे बँक बॅलेन्स वाढणार आहे. कुटुंबात आनंदाचं वातावरण असणार आहे. प्रेम जीवनासाठी हा योग शुभ ठरणार आहे.
कुंभ राशी
या लोकांसाठी पुढील अडीच दिवस सकारात्मक असणार आहे. तुम्हाला नशिबाची साथ मिळणार आहे. पैसे वाचवण्यात तुम्हाला यश मिळणार आहे. घरात पाहुण्याचं आगमन तुमच्यासाठी आनंदायी असणार आहे. नोकरदार लोकांना त्यांच्या मेहनतीचं फळं मिळणार आहे. व्यवसायिकांसाठी हा योग प्रगती घेऊन आला आहे. शत्रूदेखील तुमचं कौतुक करणार आहे.