मित्रानो, घरातील काही अडचणी व संसारातील ताणतणाव या यासारख्या अनेक अडचणी आपल्या जीवनात असतात. जर तुम्हाला देखील अशा प्रकारच्या काही समस्या असतील तर त्यासाठी आपण एक छोटा व अत्यंत प्रभावशाली असणारा उपाय पाहणार आहोत. ज्या उपायाने तुमच्या असणाऱ्या या वरील सर्व समस्यांचे अवश्य निराकरण होणार आहे.
तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक काळा धागा लागणार आहे, ज्याला आपण करदोरा अस देखील म्हणतो. आपण करदोऱ्यचा वापर नजर लागू नये म्हणून करतो लहान मुलांच्या हातापाया मध्ये बरेच जण करदोरा बांधतात तसेच मोठे व्यक्ती ही याचा वापर करतात कारण या दोऱ्याचा प्रभाव हा खूप छान आहे. काळया धाग्याचा वापर हा आपल्याला या उपायात करायचा आहे.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला सव्वा मीटर चा करदोरा वापरायचा आहे. हा उपाय मंगळवारी करायचा आहे त्यासाठी मंगळवारी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून तुम्हाला हनुमान मंदिरात जायचं आहे आणि मनोभवी त्यांना नमस्कार करून सुरवातीला 1 वेळा तुम्हाला हनुमान चालीसा म्हणायची आहे
आणि त्यानंतर हनुमानजीचा 108 वेळा मंत्र म्हणायचा आहे. तर तुम्हाला जो मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र असा आहे की
ओम् हन हनुमते नमः त्यानंतर तुम्हाला हा सव्वा मीटरचा काळा धागा घ्यायचा आहे आणि त्याला सुरवातीच्या टोकाला एक गाठ मारायची आहे.
आणि पुढे त्यानंतर त्यावर हनुमानजिंच्या पायावरील सिंदुर या गाठी वर लावायचा आहे, म्हणजे सुरवातीला एका टोकापासून सुरुवात करून सुरुवातीची पहिली गाठ तुम्हाला मारायची आहे आणि तेथील सींदुर घेऊन तुम्हाला या गाठी वर लावायचा आहे. त्यानंतर अशाचप्रकारे दुसरी गाठ मारायची आहे.
परत थोडा सिंदुर घेऊन त्यावर लावायचा आहे अश्या 9 गाठी तुम्हाला या धाग्याच्या मारायच्या आहेत. प्रत्येकवेळी देवाच्या पायावरील सिंदुर या गाठीला लावायचा आहे. शेवटी या काळया धाग्याचे दोनी टोके पकडुन दहावी गाठ म्हणजे शेवटची गाठ मारायची आहे आणि त्यावर देखील सिंदुर लावायचा आहे.
घरात कोणी आजारी असेल तर तुम्ही हा धागा त्याच्या गळ्यात घाला घराला काही बाधा झाली असेल म्हणजे घरील वारंवार आजारी पडत असतील किंवा अजून काही समस्या असतील तर हा धागा घराच्या मुख्य दरवाज्याच्या वर लावून ठेवा. जेव्हाआपली इच्छा किंवा कार्य पूर्ण होईल तेव्हा हा धागा हनुमान मंदिरात जाऊन कोणत्याही एका कोपऱ्यात ठेऊन द्यायचा आहे.