वटपौर्णिमेच्या पूजेत महिलांनी या वस्तूचे पूजन करा संसार सुखाचा होईल!

मित्रांनो आपल्या हिंदू धर्मांमध्ये अनेक सण उत्सव अगदी आनंदाने साजरे करतात. प्रत्येक सणाचे वेगळे असे महत्त्व प्राप्त झालेले आहे. अनेक जण अनेक प्रकारच्या परंपरा या पाळत असतात. तर बरेचजण याकडे अंधश्रद्धा म्हणून दुर्लक्ष देखील करीत असतात. तर प्रत्येक सणाचे वेगळेच असे महत्त्व आपल्याला शास्त्रामध्ये दिले गेलेले आहे आणि शास्त्रामध्ये ज्या त्या सणांमध्ये दिलेले नियम आपण अवश्य पाळणे गरजेचे आहे. यामुळे मग आपल्या जीवनामध्ये कोणतेही प्रकारच्या अडचणी आपल्याला अजिबात येणार नाहीत.

तर मित्रांनो तीन जून शनिवारच्या दिवशी वटपौर्णिमा साजरी केली जाणार आहे. या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी तसेच सुखी संसारासाठी वटवृक्षाचे पूजन करीत असतात. तसेच आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास देखील करीत असतात. वडाच्या झाडाची पूजा करून सात फेऱ्या देखील त्या मारीत असतात. जेणेकरून आपल्या पतीचे आयुष्य जास्त टिकेल तसेच आपला संसार देखील सुखाचा होईल.

तर वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. या दिवशी आपण वटपौर्णिमेच्या पूजेमध्ये अनेक प्रकारच्या वस्तू वापरत असतो. जसे की हिरव्या बांगड्या, आंबे, नारळ, विडा, सुपारी, पंचामृत, उदबत्ती, हळदीकुंकू, अक्षदा अशा अनेक वस्तूंचा वापर आपण करतो.

तर मित्रांनो आज मी तुम्हाला अशी एक वस्तू सांगणार आहे या वस्तू जर तुम्ही आपल्या वटपौर्णिमेच्या पूजेमध्ये याचा वापर केला तर यामुळे तुमचा संसार हा सुखी होईल. तसेच तुमच्या कुटुंबीयांची, तुमच्या मुलाबाळांची, पतीची नक्कीच प्रगती होईल. तर मित्रांनो वटपौर्णिमेच्या दिवशी महिला या कच्चे सूत आणून हे सूत घेऊन वट वृक्षाला त्या कच्च्या सुताने साथ फेऱ्या मारून ते सुत गुंडाळत असतात.

तर यातील तुम्ही कच्चे सूत तुमच्या हाताएवढे म्हणजेच एक फूट होईल एवढे कट करून घ्यायचे आहे आणि तुम्ही वटपृक्षाच्या समोर बसून सातगाठी एक फुट कच्या सुताच्या तुम्हाला बांधायचे आहेत. थोड्या थोड्या अंतरावरती तुम्हाला सात गाठी बांधायचे आहेत. जर तुम्ही वटवृक्षाची पूजा करण्यास जाणे जमत नसेल तर तुम्ही देवघरासमोर बसून एक फूट कच्चे सूत घेऊन सात गाठी बांधायचे आहेत.

प्रत्येक गाठ बांधत असताना तुम्ही आपल्या मनातील इच्छा बोलायचे आहे. नंतर सात गाठी झाल्यानंतर तुम्ही हे कच्चे सुत तुम्ही वटवृक्षाच्या जवळ किंवा जर देवघरासमोर बसून जर गाठी बांधल्या असतील तर ते कच्चे सूत तुम्ही तसेच देवघरांमध्ये ठेवायचे आहे आणि नंतर ते तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करायचे आहे. जर तुम्ही वटवृक्षाच्या समोर बसून जर या सुताच्या गाठी बांधल्या असतील तर तुम्ही त्या वटवृक्षाच्या समोर तसेच ठेवायचे आहे.

तर अशा या पद्धतीने तुम्ही वटपौर्णिमेच्या पूजेमध्ये या वस्तूचा वापर केला तर यामुळे नक्कीच तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. तुमचा संसार सुखाचा नक्कीच होईल.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment