दीड वर्षांनंतर राहू-केतूच्या राशी परिवर्तनामुळे ‘या’ पाच राशींना होणार प्रचंड धनलाभ? २०२५ पर्यंत होऊ शकतात कोट्यधीश

ऑक्टोबर महिना सुरु झाला असून या महिन्यात अनेक मोठे ग्रह राशी बदल करणार आहेत. ज्योतिषांच्या मते, तब्बल दीड वर्षानंतर राहू आणि केतू राशी परिवर्तन करणार आहेत. ३० ऑक्टोबरला राहू मेष राशीतून बाहेर पडून मीन राशीत प्रवेश करणार आहेत. त्याचबरोबर केतू सध्या तूळ राशीत असून कन्या राशीत प्रवेश करणार आहेत आणि १८ मे २०२५ पर्यंत याच राशीत राहतील. त्यामुळे राहू-केतूच्या राशी बदलामुळे पाच राशींना विशेष लाभ होण्याची शक्यता आहे. चला तर पाहूया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…

मेष राशी
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, राहू सध्या मेष राशीत आहे आणि लवकरच मीन राशीत प्रवेश करेल. यावेळी मेष राशीमध्ये गुरु-चांडाळ योग तयार होत आहे. राहू ही राशी सोडून दुसऱ्या राशीत प्रवेश करताच मेष राशीच्या लोकांना फायदा होऊ शकतो. नोकरदारांना पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात खूप प्रगती होऊ शकते.
कर्क राशी
ज्योतिष शास्त्रानुसार राहू-केतूचा राशी बदल कर्क राशीच्या लोकांसाठी चांगल्या बातम्या घेऊन येणारा ठरु शकतो. कुटुंबात सुख, समृद्धी आणि आनंद नांदू शकतो. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ होण्याची शक्यता आहे. या काळात तुमची आर्थिक स्थिती चांगली राहू शकते. नोकरीच्या ठिकाणी आनंदाची बातमी मिळू शकते.
सिंह राशी
ज्योतिष शास्त्रानुसार सिंह राशीच्या लोकांसाठी राहू-केतूचे संक्रमण खूप फायदेशीर ठरु शकते. आर्थिक अडचणी दूर होऊन आयुष्यात बरेच बदल होऊ शकतात. या राशीतील लोकांकडे पैसा येण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी प्रमोशन होऊ शकतं. समाजात मान-सन्मान वाढू शकतं.

मीन राशी
राहू-केतूचे संक्रमण मीन राशीच्या लोकांसाठी वरदान ठरु शकते. या काळात व्यवसायात नफा मिळू शकतो. धनलाभही होण्याची शक्यता आहे. नोकरी-व्यवसायात केलेले प्रयत्नही यशस्वी होऊ शकतात. भौतिक सुख सुविधेमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहू शकते.

तूळ राशी
राहू-केतूच्या राशी परिवर्तनामुळे तूळ राशीच्या लोकांचे अच्छे दिन येऊ शकतात. तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकतो. जुन्या गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. अविवाहित आहेत त्यांना लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. पती-पत्नीच्या नात्यात गोडवा येऊ शकतो.

Leave a Comment