मित्रांनो आपल्या प्रत्येकाचीच कोणती ना कोणती कुलदेवता ही असते आणि आपण दरवर्षी कुलदेवतेच्या दर्शनासाठी सर्व कुटुंब जात असतो आणि अनेक प्रकारचे नैवेद्य तसेच देवीची ओटी भरणी असे अनेक आपण विधी देखील करीत असतो. बऱ्याच जणांना आपली कुलदेवी देखील कोणती आहे ते माहीत नसते.कुलदेवता आणि कुलदेवी ही प्रत्येकाचीच असते.
तर कुलदेवीच्या अशा काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजेच या वस्तू तुम्ही आपल्या घरामध्ये ठेवायचे आहेत. यामुळे कुलदेवतेचा आशीर्वाद आपल्या कुटुंबीयांवर सदैव राहतो आणि कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना देखील आपणाला करावा लागत नाहीत. तर या वस्तू नेमक्या कोणत्या आहेत.
तर आपल्या कुलदेवतेचा जो फोटो आहे हा फोटो देखील आपण आपल्या घरामध्ये ठेवणे गरजेचे आहे. तर हा कुलदेवतेचा फोटो तुम्हाला कुलदेवतेच्या ठिकाणी किंवा तुम्हाला जर आपली कुलदेवता माहिती असेल तर तुम्ही आसपासऊन देखील कुलदेवतेचा फोटो खरेदी करून आपल्या देवघरांमध्ये पुजायचा आहे.
तसेच तुम्ही ते कुलदेवतेची मूर्ती देखील आपल्या देवघरांमध्ये ठेवू शकता. म्हणजेच आपण त्या कुलदेवतेच्या मूर्तीला अभिषेक वगैरे करता येतो. त्यामुळे तुम्ही कुलदेवतेची मूर्ती किंवा फोटो आपल्या देवघरांमध्ये अवश्य ठेवायचे आहे. तसेच तुम्ही कुलदेवतेचा टाक देखील सोनारांकडून बनवून घेऊ शकता आणि हा टाक आपल्या घरामध्ये ठेवायचा आहे आणि दररोज त्याची विधिवतपणे पूजा देखील करायचे आहे.
यामुळे कुलदेवता आपल्या कुटुंबीयांचे रक्षण करते. जर तुमच्यापैकी कोणाला आपली कुलदेवताच कोणती आहे ही माहिती नसेल तर तुम्ही एक तांब्याचा कलश घेऊन तो स्वच्छ धुऊन त्यामध्ये स्वच्छ पाणी भरून पाच विड्याची पाने तुम्ही त्या कोलशाभोवती ठेवायचे आहेत आणि त्यावरती नारळ ठेवायचा आहे आणि हा कुलदेवतेचा कलश तुम्ही आपल्या घरामध्ये स्थापित देखील करू शकता.
आणि दररोज याची पूजा करायची आहे आणि दर आठवड्याला तुम्ही या कलशातील पाणी तसेच जे पाने आहे ते बदलायची आहेत. म्हणजेच नारळ आहे तसाच ठेवायचा आहे आणि जर आठवड्याला म्हणजेच कुलदेवतेच्या वारा दिवशी तुम्ही पाणी हे एखाद्या झाडाला किंवा तुळशीला अर्पण करायचे आहे आणि विड्याची पाने तुम्ही नवीन पाच त्यामध्ये घालून नंतर हा विधिवतपणे कलश आपल्या देवघरांमध्ये ठेवायचा आहे.
तर अशा पद्धतीने तुम्ही या कुलदेवतेच्या वस्तू आपल्या देवघरात ठेवल्या तर सदैव तुमचे रक्षण कुलदेवता करतील आणि त्यांचा कृपाशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होईल.