पितृपक्ष या राशींसाठी असणार खास! राजयोगांचा अपार लाभ, हाईल धनलाभ

मित्रानो, गणेशोत्सवाची सांगता झाली असून, आता भाद्रपद पौर्णिमेनंतर पितृपक्षाला सुरुवात होत आहे. २९ सप्टेंबरपासून महालयारंभ होत आहे. १४ ऑक्टोबर २०२३ रोजी सर्वपित्री अमावास्या आहे. पितृपक्षाची सुरुवात होताना पौर्णिमेला काही अद्भूत योग जुळून येत आहेत. या शुभ योगांमध्ये पितृ पंधरवड्याला सुरुवात होत असून, काही राशींसाठी हा काळ उत्तम ठरू शकेल.

पौर्णिमेला लक्ष्मी देवीची विशेष पूजा करण्याची परंपरा आहे. त्यामुळे पौर्णिमेला आणि पितृपक्षाची सुरुवातीला लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त होऊ शकते. भाद्रपद महिन्यातील पौर्णिमेच्या शुभ दिवशी वृद्धी योग, सर्वार्थ सिद्धी योग, अमृत सिद्धी योग आणि उत्तराभाद्रपद नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने पितृपक्षाची सुरुवात उत्तम ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार ग्रहांच्या प्रभावामुळे आणि शुभ योगामुळे पौर्णिमा आणि पितृपक्षाची सुरुवात काही राशींसाठी खूप शुभ असणार आहे. या राशींची अपूर्ण काम पूर्ण होऊ शकतील. सुख, शांतता आणि समृद्धी वाढेल, असे सांगितले जात आहे.

या ५ राशीच्या व्यक्तींनी काही उपाय केल्याने कुंडलीतील शुक्राची स्थिती मजबूत होईल आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वादही प्राप्त होईल, असे म्हटले जात आहे. कोणत्या राशींना उत्तम लाभ, यश-प्रगतीची संधी मिळू शकेल? जाणून घ्या…

वृषभ राशींच्या व्यक्तींना पितृपक्षाची सुरुवात चांगली ठरू शकेल. आई-वडिलांचे सहकार्य मिळेल. जीवनात सुख-समृद्धीची शुभ संधी मिळेल. कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. सहकाऱ्यांचेही पूर्ण सहकार्य मिळेल. देवी लक्ष्मीची कृपा असेल. वैवाहिक जीवन चांगले राहील. जोडीदारासाठी सरप्राईज प्लॅन करू शकता. भावंडांचे सहकार्य मिळेल. घरातील कामे पूर्ण करण्यात सहकार्य मिळेल. शक्य असल्यास फळे, कपडे, पिवळ्या वस्तूंचे दान करा.

सिंह राशीच्या व्यक्तींना पितृपक्षाची सुरुवात लाभदायक ठरू शकेल. उद्दिष्टे पूर्ण करू शकाल. पैसे कमावण्याच्या अनेक संधी मिळतील. कौटुंबिक जीवन चांगले राहील. व्यवसायात चांगली प्रगती होईल. मुले अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील. लव्ह लाइफ मजबूत होईल. नोकरदारांना अनेक संधी मिळतील. परदेशात जाण्याची संधी मिळेल. घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धीसाठी गुरुवारी केशर, पिवळे चंदन आणि हळद दान करा. यामुळे कुंडलीत गुरूची स्थिती मजबूत होऊ शकेल.

कन्या राशीच्या व्यक्तींसाठी पितृपक्षाची सुरुवात शुभ फलदायी ठरू शकेल. प्रतिस्पर्ध्यांना चितपट करू शकाल. व्यवसायात चांगली कामगिरी करू शकाल. एकापेक्षा जास्त स्त्रोतांकडून पैसे कमविण्यात यशस्वी होऊ शकतात. कौटुंबिक सदस्याच्या लग्नाविषयी चर्चा निश्चित होऊ शकते, ज्यामुळे घरात उत्सवाचे वातावरण निर्माण होईल. मुलांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. नवीन लोकांकडून विशेष माहिती मिळेल, जी भविष्यात उपयोगी पडेल. देवी लक्ष्मी कृपेने अपूर्ण कामे पूर्ण होतील. शक्य असल्यास यथाशक्ती दान-धर्म करावा. तांब्यावर कोरलेले कुबेर यंत्र, श्रीयंत्र जवळ बाळगावे.

वृश्चिक राशीच्या व्यक्तींना पितृपक्षाची सुरुवात सुखद ठरू शकेल. सर्वार्थ सिद्धी योगाच्या शुभ प्रभावाने कोणतेही काम कराल, त्यात यश मिळेल. कामाचे सर्वत्र कौतुक होईल. चांगला नफा मिळवण्यात यशस्वी व्हाल. सरकारी क्षेत्राकडून आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. विद्यार्थ्यांना शिक्षक आणि वडिलांचे पूर्ण सहकार्य मिळेल. शहाणपणाने आणि विवेकाने घेतलेल्या निर्णयांमध्ये यश मिळेल. कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. त्यांच्या संपर्काने अपूर्ण कामेही पूर्ण होऊ शकतात. सामाजिक आणि धार्मिक कार्य केल्याने समाजात सन्मान वाढेल. लोक सल्ला विचारायला येतील. पांढरे वस्त्र परिधान करून देवी लक्ष्मीची पूजा करावी. श्रीसूक्ताचे पठण करावे. कमळाचे फूल अर्पण करावे.

मकर राशीच्या व्यक्तींना पितृपक्षाची सुरुवात अनुकूल ठरू शकेल. वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांच्या आनंदात वाढ होईल. एखाद्या कार्यक्रमाबाबत चर्चा होऊ शकते. कुटुंबातील एखाद्या सदस्याला सरकारी नोकरी मिळू शकते. घरातील वातावरण छान राहील. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. जोडीदारासोबत काही सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता, जिथे अनेक महत्त्वाच्या लोकांना भेटू शकता. व्यावसायिक प्रगतीसाठी गुरुवारी लक्ष्मी नारायण मंदिरात लाडू अर्पण करा.

Leave a Comment