मित्रांनो आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक रूढी परंपरा पूर्वीपासून चालत आलेले आहेत आणि याचे काटेकोरपणे आज देखील पालन केले जाते. काही जण याकडे अंधश्रद्धा म्हणून लक्षही देत नाही. हिंदू धर्मात तिथीला महत्त्व आहे, त्यासाठी दररोजचं पंचांग पाहिलं जातं. तसंच श्राद्ध पक्षातील प्रत्येक तिथीचं आपलं असं महत्त्व आहे. कारण प्रत्येक तिथीला कोणता ना कोणता पूर्वज आपल्याला सोडून गेलेले असतात. त्यामुळे या तिथीलाच आपल्या पूर्वजनांना श्राद्ध केलं जातं. पण तुम्हाला जर पूर्वजाच्याची मरण तिथी माहिती नसेल किंवा घरात काही लोक वेगवेगळ्या तिथीला देहावसान झाले असतात, अशावेळी कुठल्या तिथीला श्राद्ध करता येईल हे जाणून घ्या.
हिंदू पंचांगानुसार, भरणी श्राद्ध 2 ऑक्टोबर 2023 ला असणार आहे. या दिवशी भरणी नक्षत्र संध्याकाळी 06:24 पर्यंत असणार आहे. धार्मिक मान्यतांनुसार भरणी श्राद्ध मृत्यूनंतर एक वर्षांनी करायचं असतं. लग्नापूर्वी मृत्युमुखी पडणाऱ्यांचे श्राद्ध पंचमी तिथीला केलं जातं, जर भरणी नक्षत्र पंचमी तिथीला आले तर हे दुर्मिळ आणि विशेष असतं.
हिंदू पंचांगानुसार नवमी श्राद्ध 7 ऑक्टोबरला असणार आहे. नवमी श्राद्धाला मातृ श्राद्ध किंवा मातृ नवमी असंही म्हटलं जातं. या तिथीला घरातील आई, आजी, आजी यांचं श्राद्ध केलं जातं. मातृ नवमीच्या दिवशी आपल्या आई-वडिलांना तर्पण, श्राद्ध किंवा पिंडदान करुन प्रसन्न केलं जातं.
पंचांगानुसार 14 ऑक्टोबरला सर्वपित्री अमावस्या आहे. या तिथीला ज्या पितरांच्या तारखा माहित नाहीत त्यांचं श्राद्ध केलं जातं. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर, सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी सर्व ज्ञात आणि अज्ञात पितरांसाठी श्राद्ध, तर्पण आणि पिंड दान करता येतं.