मित्रांनो 29 सप्टेंबर शुक्रवारच्या दिवसांपासून पितृपक्षाला सुरुवात होते. पितृपक्षांमध्ये अनेक विधी केल्या जातात. जे लोक आपल्या सोबत नाहीत म्हणजेच ज्या व्यक्ती मृत पावलेल्या आहेत त्यांच्या कृपाशीर्वादासाठी पितृपक्ष साजरा केला जातो आणि या पितृपक्षांमध्ये मृत लोकांचे श्राद्ध घातले जाते. तर 29 सप्टेंबर पासून पितृपक्ष सुरू होणार आहे आणि तुम्हाला पितृपक्षापासून दररोज हे एक काम करायचे आहे.
यामुळे आपल्याला आपल्या वडीलधाऱ्या म्हणजेच मृत पावलेल्या व्यक्तींचा आशीर्वाद मिळतो. त्यांच्या कृपाशीर्वादामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल. तर हे काम नेमके कोणते आहे जे आपल्याला पितृपक्षांमध्ये दररोज करायचे आहे. हे काम आपल्याला पंधरा दिवस सलग करायचे आहे. म्हणजेच 29 सप्टेंबर पासून ते घटस्थापने पर्यंत हे काम दररोज न चुकता करायचे आहे.
तर तुम्ही दररोज आपल्या घरी जेवण बनवता त्यावेळेस जेवण बनविताना पहिली चपाती किंवा पहिली भाकरी आपणाला एका प्लेटमध्ये बाजूला काढून ठेवायची आहे आणि ही चपाती किंवा भाकरी तुम्ही आपल्या गच्चीवर ठेवायची आहे. म्हणजेच ही चपाती पक्षांना कावळ्यांना तुम्ही ठेवायचे आहे आणि ही चपाती आणि भाकरी तुम्ही दुपारी बारा वाजण्याच्या आत ठेवायचे आहे.
असे दररोज तुम्हाला पंधरा दिवस करायचे आहे. यामुळे आपल्या पितरांचा आशीर्वाद आपणाला प्राप्त होतो. तसेच आपल्या जीवनामध्ये सुख-समृद्धी नांदेल. सर्व अडचणीतून आपणाला सुटका देखील प्राप्त होते. तर 29 सप्टेंबर पासून तुम्ही देखील हे काम न चुकता दररोज पंधरा दिवस करायचे आहे.