ज्येष्ठ नागरिकांसाठी या आर्थिक मदत देणाऱ्या महत्वाच्या योजना!

मित्रांनो आज आपण ज्येष्ठ नागरिकांना असे चार फायद्याच्या गोष्टी सांगणार आहोत त्या गोष्टी म्हणजे वयाच्या साठ वर्षानंतर ज्येष्ठ नागरिकाला घेता येणार आहेत आणि त्यांना पुढील त्यांचं आयुष्य जगण्यासाठी कुठलीही प्रकारची आर्थिक अडचण येणार नाही जे चार फायदे आहेत त्या फायद्यांचा ज्येष्ठ नागरिकांना नक्कीच आर्थिक लाभ होणार आहे असे कोणते चार फायदे आहेत ते ज्येष्ठ नागरिकांना वयाच्या साठ वर्षानंतर घेता येणार आहेत आणि त्यांची आर्थिक अडचण सुद्धा दूर होणार आहे.

ज्येष्ठ नागरिकांसाठी पहिला जो फायदा आहे तो आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धावस्था निवृत्ती वेतन योजना. ज्येष्ठ नागरिकांनासाठी असलेल्या शासकीय निवृत्ती वेतन योजनांनी जेष्ठ नागरिकांना आर्थिक सुरक्षा प्रदान करण्यात महत्त्वाची भूमिका निभावली जात आहे. म्हणून इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धावस्था निवृत्ती वेतन योजना ही अशीच एक पेन्शन योजना आहे जी ही योजना 2007 मध्ये भारतीय ग्रामीण विकास मंत्रालयाने सुरू केली होती जेष्ठ नागरिक पेन्शन व विधवा पेन्शन तसेच अपंगांना पेन्शन देऊन लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्य करणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

या योजनेचा लाभ फक्त 65 वर्षे व त्यापेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना घेऊ शकतात तसेच या योजनेअंतर्गत दर महिन्याला ज्येष्ठ नागरिक शासनाकडून पेन्शन सुद्धा दिली जात आहे म्हणून अगोदरच या योजनेअंतर्गत दरमहा 600 रुपये पेन्शन मिळत होती परंतु आता या पेन्शनमध्ये वाढ करण्यात आलेली आहे आता या योजनेअंतर्गत दरमहा एक हजार रुपये पेन्शन दिली जात आहे म्हणून यासाठी एक रुपया सुद्धा भरण्याची गरज जेष्ठ नागरिकाला लागणार नाही म्हणून शंभर टक्के अनुदानावर ही योजना राबवली जात आहे तसेच सरकारकडून ही पेन्शन योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू केली आहे म्हणून या योजनेअंतर्गत विधवा महिला आणि अपंग व्यक्ती सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

ज्येष्ठ नागरिक कार्ड म्हणजेच सीनेजर सिटीजन कार्ड
ज्येष्ठ नागरिक कार्ड प्रमाणपत्र म्हणजेच काय तर थोडक्यात सांगायचे झाले तर ज्येष्ठ नागरिकांना सरकारी विभागाकडून सार्वजनिक कंपनी तसेच खाजगी किंवा व्यवस्थापना मार्फत दिल्या जाणाऱ्या सवलती व सेवा तसेच प्राधान्य सेवा मध्ये ऍडमिशन व प्रवेश सुलभ सोपा करण्यासाठी वयाचा प्रवाह म्हणून जेष्ठ नागरिक कार्ड सीनियर सिटीजन कार्ड वापरू शकतात तसेच या एसटीमध्ये प्रवास करताना प्रवास भाड्यात सवलत घेण्यासाठी हे कार्ड आवश्यक आहे व हे कार्ड असेल तर हॉस्पिटलमध्ये कमीत कमी साठ वर्षे वय असलेले व्यक्तींना 30 टक्के सवलत असते म्हणून ही बराच लाभ देणारी ज्येष्ठ नागरिकांसाठी योजना आहे.ज्येष्ठ नागरिक कार्ड हे कार्ड ऑनलाइन काढता येते.

प्रधानमंत्री वय वंदना योजना लाभार्थी व त्यापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तीच घेऊ शकतात ही योजना दहा वर्षाची आहे म्हणून प्रधानमंत्री वय वंदना योजना अंतर्गत एक महिना तीन महिने व सहा महिने तसेच वार्षिक पेन्शन सुविधा उपलब्ध आहे यापैकी कोणत्याही सुविधा लाभ घ्यायच्या असेल तर गुंतनुकदार स्वतः निवडू शकतो. या योजनेअंतर्गत गुंतवणूकदाराला वार्षिक आठ टक्के दराने व्याज मिळते म्हणून या योजनेत एक हजार रुपये ते पंधरा लाखापर्यंत केली जाऊ शकते आणि त्यातून परतावा सुद्धा मिळू शकतो म्हणून गुंतवणुकीची हीशोभाने मिळत असते. ज्येष्ठ नागरिकांना त्यांची पुढील आयुष्य हे आनंदाने आणि सुखमय जगण्यासाठी ही योजना एक चांगली योजना राबवली जात आहे.

ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही योजना ज्येष्ठ नागरिकांच्या वयाच्या साठ वर्षापेक्षा जास्त व असलेल्या नागरिकांसाठी अतिशय चांगल्या प्रकारची बचत योजना आहे तसेच या योजनेमध्ये निवृत्तीनंतर चांगल्या प्रकारे उत्पन्नाचे साधन म्हणून ज्येष्ठ नागरिक गुंतवणूक करू शकतात ही योजना भारत सरकारकडून सार्वजनिक राबवली जात आहे.

अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment