आठवडा राशिभविष्य : २५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२३

वैदिक ज्योतिषशात्रानुसार तुमच्या भविष्याबाबत अंदाज लावण्याचे विविध मार्ग असतात. प्रत्येक व्यक्तीच्या नावाच्या अक्षरावरून, मूळ अंकावरून, जन्मतारखेवरून तसेच कुंडलीवरून त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या चढ उतारांचे अंदाज वर्तवले जाऊ शकतात. अशीच ज्योतिषशास्त्राची एक शाखा म्हणजे टॅरो कार्ड्स. या टॅरो कार्डनुसार काही राशीच्या लोकांना येत्या आठवड्यात सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. तसेच या आठवड्यात ४ राशीच्या लोकांना मोठा आर्थिक लाभ होण्याचीही दाट शक्यता आहे. २५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२३ पर्यंतचा काळ तुमच्या राशीसाठी कसा असेल हे साप्ताहिक टॅरो राशीभविष्यातून जाणून घेऊ या.

मेष : या आठवड्यात मेष राशीच लोक बाहेर फिरायला जाऊ शकता, या प्रवासाचा त्यांना फायदा होऊ शकतो. तुम्ही जवळच्या व्यक्तीकडून पाठिंबा मिळण्याची वाट पाहू शकता, कामावर लक्ष केंद्रित करु शकता.
वृषभ : या राशीच्या लोकांची करिअरमध्ये खूप प्रगती होऊ शकते. नवीन संधी तुमची वाट पाहत आहेत, त्यामुळे या काळात आर्थिक लाभ होऊ शकतो. तसेच तुम्ही घेतलेले निर्णय योग्य असल्याचे सिद्ध होऊ शकते.

मिथुन : तुमची उर्जा योग्य दिशेने वापरल्यास तुम्हाला यश मिळू शकते. काही मोठी कामे पूर्ण होऊ शकतात. या काळात तुमच्या जोडीदाराकडे लक्ष देणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकतं.
कर्क : या आठवड्यात तुम्हाला मोठ्या कामांमध्ये यश मिळू शकतं. हा काळ तुमच्यासाठी उत्सा वाढवणारा आणि तुमची कामे पूर्ण करणारा ठरु शकतो.
सिंह: आजूबाजूच्या लोकांपासून सावध न राहिल्यास मोठे नुकसान होऊ शकते. करिअरमध्ये संकटाची परिस्थिती येऊ शकते. गुंतवणूक करण्यापूर्वी नीट विचार करण्याची आवश्यकता आहे.

कन्या : तुमच्यावर अनेक जबाबदाऱ्या येऊ शकतात पण त्यांना न घाबरता पूर्ण करा. या आठवड्यात काळजीपूर्वक नियोजन करावे लागेल.
तूळ : महिलांच्या माध्यमातून तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते. या आठवड्यात तुम्हाला मोठा आर्थिक लाभही होऊ शकतो. तुमची आर्थिक स्थिती सुधारुन कर्जही संपू शकते.

वृश्चिक : या काळात तुमच्या आर्थिक समस्या दूर होऊ शकतात.
धनु : तुमच्या आजूबाजूला सकारात्मक वातावरण राहू शकते, ज्याचा तुम्हाला फायदा होण्याची शक्यता आहे.
मकर : तुमच्या जीवनात आव्हाने येऊ शकतात पण त्यांना न घाबरता तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्याही चांगल्या प्रकारे पार पाडू शकता. या काळात कुटुंबाकडे दुर्लक्ष करू नका.

कुंभ : खर्चावर नियंत्रण ठेवा अन्यथा तुम्हाला कर्ज घ्यावे लागू शकते. आर्थिक नियोजनावर भर देण्याची गरज भासू शकते. या काळात कुटुंबाबरोबर चांगला वेळ घालवू शकता.
मीन : पुढील ७ दिवस तुमच्या कामाचा ताण वाढू शकतो.

Leave a Comment