1 ऑक्टोबर 2023 रोजी कन्या राशीत तीन ग्रहांची युती होणार आहे. यात बुध, मंगळ आणि सूर्य एकत्र येणार आहे. त्यामुळे त्रिग्रही योग तयार होणार आहे. ग्रहांमध्ये राजकुमाराचा दर्जा असलेला बुध ग्रह 1 ऑक्टोबर 2023 रोजी कन्या राशीत प्रवेश करेल. तर मंगळ आणि सूर्य ग्रह या राशीत ठाण मांडून बसले आहेत.
त्रिग्रही योगाचा राशीचक्रावर परिणाम दिसून येईल. तीन राशीच्या जातकांना या स्थितीचा लाभ मिळणार आहे. 3 ऑक्टोबर मंगळ ग्रह गोचर करेल. त्यानंतर हा त्रिग्रही संपुष्टात येईल.
मिथुन राशीच्या जातकांना त्रिग्रही योगाचा फायदा होईल. भौतिक सुख अनुभवता येईल. गाडी किंवा जमिन खरेदीचा योग जुळून येईल. आर्थिक स्थिती सुधारेल. अडकलेले पैसे परत मिळतील. सिंह राशीच्या जातकांना त्रिग्रही योगमुळे लाभ मिळेल. उत्पन्नात वाढ होईल. नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली ऑफर मिळेल. मनासारखा पगार मिळू शकतो. आत्मविश्वास दुणावलेला राहील.
धनु राशीच्या जातकांच्या कर्मभावात ही युती होत आहे. त्यामुळे सकारात्मक बदल दिसतील. हाती घेतलेलं काम चुटकीसरशी पूर्ण कराल. नवीन व्यवसाय सुरु करण्यास योग्य वेळ आहे.