आली गौराई अंगणी! ज्येष्ठागौरी आवाहन, मुहूर्त, पूजा विधी आणि महत्त्व

भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्ठीला ज्येष्ठागौरी आवाहन केले जाते. गौरीला आदीशक्तीचे रुप मानले जाते. गौरीगणपतीचा सण हा महाराष्ट्रात अगदी मोठ्या भक्तीभावात आणि उत्साहात साजरा केला जातो.

गणपतीच्या काळात गौरीला विशेष महत्त्व आहे. महाराष्ट्रातील विविध भागात, विविध पद्धतीने तिचे पूजन केले जाते. अनुराधा नक्षत्रात गौरी आवाहन केले जाते. या दिवशी ती एकटी नाही तर दोघी बहिणी येतात. ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरी या नावाने त्यांना ओळखले जाते. गौरीला गणपतीची आई अर्थात पार्वतीची म्हणून ओळखले जाते तर दुसरी ही माता लक्ष्मी थोरली बहिण मानली जाते. काही भागात यादिवशी महालक्ष्मी पूजा केली जाते. जाणून घेऊया मुहूर्त पूजा विधी

गौरी आवाहन शुभ मुहूर्त
२१ सप्टेंबर रोजी दुपारी १४. १६ मिनिटांनी सप्तमी सुरु होईल. त्यानंतर दुपारी ३.३५ मिनिटांपर्यंत गौरीचे आगमन घरोघरी होईल.

गौरी पूजन तिथी
ज्येष्ठागौरी पूजनचा शुभ मुहूर्त दुपारी १२ च्या आधी करुन गौरीला नैवेद्य काही भागात गोडाचा नैवेद्य दाखवला जातो तर काही भागात तिखटाचा नैवेद्यही केला जातो.

गौरी विसर्जन
षष्ठीलाच्या दिवशी गौराईचे आगमन होऊन सप्तमीला ती माहेराचं सुख उपभोगते तर अष्टमीच्या दिवशी तिचे विधीपूर्वक विसर्जन केले जाते.

प्रत्येत भागात गौरीचे वेगवेगळ्या पद्धतीने पूजा केली जाते. यामध्ये धातूची, मातीची प्रतिमा किंवा कागदावर गौरीचे चित्र काढून तर काही ठिकाणी नदीकाठचे पाच लहान खडे आणून गौरीचे पूजन केले जाते. काही ठिकाणी सुगंधीत फुले असणाऱ्या वनस्पतीची रोपे अथवा तेरड्याची रोपे एकत्र बांधून त्यांची प्रतिमा तयार करतात आणि त्यावर मातीचा मुखवटा चढवतात.

Leave a Comment