Friday, September 22, 2023
Homeअध्यात्मगणेश चतुर्थीनिमित्त ‘या’ काही मंत्रांचा करा जप; गणरायाची राहिल कृपादृष्टी!

गणेश चतुर्थीनिमित्त ‘या’ काही मंत्रांचा करा जप; गणरायाची राहिल कृपादृष्टी!

मित्रानो, लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणपती बाप्पाची विधीपूर्वक प्रतिष्ठापना केली जाईल. यानंतर भक्तगण बाप्पाची मनोभावे पूजा करतील. यामुळे गणेशोत्सावाचे ५ ते १० दिवस अतिशय उत्साहाचे, आनंदाचे आणि जल्लोषपूर्ण असतात. गणेशोत्सवात आरती, पूजा विधी यांना विशेष महत्व असते. पूजेच्या दरम्यान गणपती बाप्पाचे आवडते मंत्रोच्चार करणे शुभ मानले जाते. यातून नोकरी, धंद्यात प्रगती, सुख- समृद्धी आणि संकट दूर करण्यासाठी गणरायाकडे साकडं घातले जाते.

चतुर्थीच्या दिवशी तुम्ही खालील दिलेल्या मंत्रांचा २१ वेळा जप केल्यास गणपती बाप्पा प्रसन्न होतो असे मानले जाते. पण शक्य नसल्यास तुम्ही दिवासातून एकदा तरी या मंत्रांचा जप आवर्जून करा. पण हे मंत्र जपताना त्याचे उच्चारण नीट करा.

गणेश मनोकामना पूर्ती मंत्र
ॐ गं गणपतये नमः

गणपतीला प्रसन्न करण्याचा मंत्र
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ।निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥

गणेश गायत्री मंत्र
ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो बुदि्ध प्रचोदयात्।
गं क्षिप्रप्रसादनाय नम: .

विशेष इच्छा पूर्ती मंत्र
ॐ ग्लौम गौरी पुत्र, वक्रतुंड, गणपति गुरु गणेश, ग्लौम गणपति, ऋदि्ध पति, मेरे दूर करो क्लेश.

दीर्घायुष्य मंत्र
नारद उवाच, प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम्, भक्तावासं स्मरेन्नित्यं आयुःकामार्थ सिद्धये.

RELATED ARTICLES

महाराष्ट्र

राजकीय घडामोडी

क्राइम

मनोरंजन