विवाह जुळविताना येतात अडचणी? हरतालिकेच्या दिवशी करा हा उपाय, समस्या होतील दूर!

मित्रानो, भगवान शंकर आणि देवी पार्वतींकडून इच्छित वरदान मिळविण्यासाठी, हरतालिका तृतीयेच्या दिवशी काही उपाय करून पाहा.ज्योतिषशास्त्रानुसार असे मानले जाते की, हरतालिकेच्या दिवशी हे उपाय केल्यामुळे विवाहास विलंब, वैवाहिक जीवन आणि पैशाशी संबंधित समस्या दूर होतात.

अविवाहित मुली चांगला जोडीदार मिळावा म्हणून हरतालिकेच्या दिवशी निर्जळी व्रत करतात. या दिवशी लाल कपड्यात हळदीच्या 11 गाठी बांधून देवी पार्वतीला अर्पण करा. त्यामुळे लवकर लग्न होण्याची शक्यता वाढते असे मानले जाते.

हरतालिकेच्या दिवशी शिवलिंगासमोर पाच नारळ ठेवा आणि ‘ओम श्री वर प्रदाय श्री नमः’ या मंत्राचा पाच वेळा जप करा. यानंतर शिवलिंगावर एक एक करून पाच नारळ अर्पण करावे. असे म्हणतात की याने योग्य पती मिळतो.

वैवाहिक जीवनातील उत्साह लग्नानंतर कमी झाला आहे. पती-पत्नीमधील प्रेम कमी होत असेल, तर हरतालिकेच्या दिवशी महिलांनी बेलाच्या पानात चंदनाने ओम लिहून शिवलिंगाला अर्पण करावे. असे म्हणतात की या उपायाने वैवाहिक जीवन पुन्हा सुखाने भरून जाते.

अखंड सौभाग्याचा आशीर्वाद
हरतालिकेच्या दिवशी संध्याकाळी 11 तुपाचे दिवे लावून भगवान शिव आणि पार्वतीची आरती करा. हा उपाय केल्याने अखंड सौभाग्याचा आशीर्वाद प्राप्त होतो.

प्रेमविवाहाची इच्छा असणाऱ्यांनी हरतालिका तीजच्या दिवशी लाल ओढणीत एक नाणे, सुपारी आणि लाल फूल बांधून देवी पार्वतीच्या चरणी ठेवावे आणि ओम गौरी शंकराय नमः या मंत्राचा जप करावा. यामुळे विवाहातील सर्व अडथळे दूर होतील.

भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाची तृतीया तिथी 17 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11.08 ते 18 सप्टेंबर 2023 रोजी रात्री 12.39 पर्यंत असेल. या दिवशी प्रदोष काल पूजेचा पहिला शुभ मुहूर्त संध्याकाळी 06.23 ते 06.47 पर्यंत आहे. ज्या महिला सकाळी हरितालिका तृतीयेचे व्रत करतात, त्यांच्यासाठी 18 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 06.07 ते 08.34 पर्यंत पूजेचा शुभ मुहूर्त आहे.

हरतालिका तृतीयाची पूजा रात्रीच्या चार प्रहरात करण्याची प्रथा आहे. हा उपवास सूर्योदयापासून सुरू होतो आणि दुसऱ्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी 24 तासांनी संपतो. या दिवशी काही महिला निर्जळी उपवासही करतात.

Leave a Comment