भारताची सर्वात मोठी मोबाईल कंपनी म्हणून ओळख असलेलं एअरटेल हे त्यांच्या ग्राहकांना लागणाऱ्या सर्व सुविधा ग्राहकांना देत असते. एअरटेल च्या ग्राहकांसाठी रिचार्ज प्लॅन, एक्सट्रा रिचार्ज, डाटा पॅक, sms पॅक डाटा रोमिंग, OTT सबस्क्रिप्शन यासह अनेक प्लॅन्स आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेले असतात. त्यातच एअरटेल वेगवेगळ्या ऑफर्स देऊन युजर्सला खुश करण्याचा प्रयत्न करत असते. कंपनीने भरपूर प्लॅन्स देऊन त्यांच्या युजरला चांगले बेनिफिट ऑफर देखील उपलब्ध करून दिलेल्या आहे.
आता कंपनी अजून वेगवेगळे प्लॅन घेऊन आलेली आहे. जेणेकरून युजर त्याचा लाभ घेऊ शकतील. आता एअरटेल च्या 200 रुपयाच्या रिचार्ज वर वेगवेगळ्या ऑफर्स देण्यात येत आहे. ज्यामुळे युजर्सचा पुरेपूर फायदा होणार आहे. एअरटेल च्या फक्त 155 रुपयाच्या प्लॅन मध्ये 24 दिवसांची व्हॅलिडिटी आहे. यात युजर्सला अनलिमिटेड कॉलिंग, 300 SMS, 1GB डेटा यासह हॅलो ट्यून्स आणि विंक म्युसिक चा ऍक्सेस देखील देण्यात येणार आहे.
यानंतर 179 च्या पॅक सोबत 300 SMS, 2GB डाटा, हॅलो ट्यून, विंक म्युसिक ऍक्सेस दिल्या जाणार आहे. एअरटेल च्या 199 रुपयाच्या पॅक सोबत 3GB डाटा पॅक, 300 SMS, STD आणि रोमिंग नेटवर्क वर अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, हॅलो ट्यून आणि विंक म्युसिक ऍक्सेस सुद्धा देण्यात येणार आहे.
हा पॅक 30 दिवसांसाठी व्हॅलिड असणार आहे. या ऑफर्स चा लाभ घेण्यासाठी एअरटेल च्या वेगवेगळ्या वेबसाईट वर जाऊन रिचार्ज करावा लागेल. तसेच एअरटेल थँक्स अँप वरून देखील तुम्ही रिचार्ज करू शकतात आणि या वेगवेगळ्या ऑफर्सचा लाभ घेऊ शकतात.
अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.