11 ते 17 सप्टेंबर : सूर्य आणि बुधामुळे या राशींच्या दारी येईल लक्ष्मी! साप्ताहिक राशीभविष्य

मित्रानो, आज शेवटचा श्रावण सोमवार आणि शेवटचा श्रावण आठवडा आहे. या आठवड्यात सूर्य कन्या राशीत गोचर करणार आहे. तर ग्रहांचा राजकुमार बुध सिंह राशीत मार्गी होणार आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्याचा 11 to 17 तारखेपर्यंतचा आठवडा आर्थिक आणि करिअरच्या दृष्टीकोनातून तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य..

मेष राशी
या आठवड्यात मेष राशीच्या लोकांसाठी कार्यक्षेत्रात प्रगती घेऊन आला आहे. कुटुंबासोबत आनंददायी वेळ घालविणार आहात. या आठवड्यातील सहली पुढे ढकलणे योग्य ठरणार आहे. आर्थिक दृष्टिकोनातूनही खर्च वाढणार आहे. वडिलांच्या बाबतीत जास्त खर्च होणार आहे. तुम्ही तुमच्या प्रेम संबंधात भविष्याभिमुख राहिल्यास आनंदी वातावरण असेल.
शुभ दिवस: 12,13,14

वृषभ राशी
वृषभ राशीच्या लोकांसाठी आठवडा खूप सुखद असणार आहे. कुटुंबात आनंद आणि सुसंवादाची परिस्थिती असल्याने तुम्ही प्रसन्न असणार आहात. व्यवसायिकांसाठी विशेष लाभ होणार आहे. आयुष्यात सुख समृद्धीचे योगायोग जुळून येणार आहे. कार्यक्षेत्रात यश प्रगतीचा शुभ संयोग आहेत. आर्थिक बाबींसाठीही हा आठवडा चांगला असणार आहे.
शुभ दिवस: 12,13

मिथुन राशी
मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिक बाबतीत शुभ असणार आहे. आनंद आणि सुख तुमच्या दारावर येणार आहे. नोकरीच्या ठिकाणी प्रगतीच्या अनेक संधी मिळणार आहे. आर्थिक बाबतीत हा आठवडा अधिक खर्चिक असणार आहे. या सप्ताहात प्रवासातून फायदा होणार आहे.
शुभ दिवस: 12,13,15

कर्क राशी
कर्क राशीच्या लोकांसाठी आठवडा संमिश्र असणार आहे. तुमचं मन प्रसन्न असणार आहे. आर्थिक बाबतीत खर्चिक असणार आहे. कुटुंबात काही वादविवाद होऊ शकतात. या आठवड्यातील सहली पुढे ढकला. आठवड्याच्या शेवटी आनंदाची बातमी मिळणार आहे.
शुभ दिवस: 12,15

सिंह राशी
या आठवड्यात सिंह राशीच्या लोकांसाठी आर्थिक बाबींमध्ये चांगला असणार आहे. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. गुंतवणुकीतून चांगला परिणाम दिसणार आहे. कामाच्या ठिकाणी आळस सोडून लक्षकेंद्रीत करा. प्रवासातून शुभ परिणाम दिसून येणार आहे.
शुभ दिवस: 12,13,14

कन्या राशी
या राशीच्या लोकांना कार्यक्षेत्रात प्रगती होणार आहे. वडिलधाऱ्यांच्या मदतीने ते जीवनात आनंद आणि सुसंवाद तुम्हाला यशस्वी होणार आहात. आर्थिक बाबींमध्येही तुमच्या अंतर्ज्ञानाचे पालन करून निर्णय घेतल्यास फायदा होईल. या प्रवासातून तुम्हाला फायदा होणार आहे. घरातील ज्येष्ठ व्यक्तीची प्रकृती बिघडणार आहे. आठवड्याच्या शेवटी आनंद तुमच्या दारावर येणार आहे.
शुभ दिवस: 14,15

तूळ राशी
या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिक बाबतीत शुभ असून धनलाभ होणार आहे. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत सहलीला जाण्याचा बेत आखणार आहात. कामाच्या ठिकाणी दिलेले आश्वासन पूर्ण होणार नाही. आठवड्याच्या शेवटी मन अस्वस्थ असणार आहे.
शुभ दिवस: 14,15

वृश्चिक राशी
या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिकबाबत शुभ असणार आहे. तुम्हाला धनलाभ होणार आहे. कोणत्याही नवीन गुंतवणुकीतूनही फायदा होणार आहे. कामाच्या ठिकाणी आत्मविश्वासाने निर्णय घेतल्यास फायदा होईल. या आठवड्यात तुम्हाला प्रवासातून फायदा होणार आहे.

धनु राशी
या राशीच्या लोकांना नोकरीच्या ठिकाणी प्रगती आणि मान-सन्मानही घेऊन येणार आहे. स्त्रीच्या मदतीने तुमच्या प्रकल्पात यश मिळणार आहे. हा आठवडा आर्थिक बाबींसाठीही चांगला असून धनलाभ होणार आहे. तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून पूर्ण पाठिंबा मिळणार आहे. या आठवड्यात तुमच्या प्रवासात काही अडथळे येऊ शकतात. आठवड्याच्या शेवटी तुमचा पार्टीचा मूड असेल.
शुभ दिवस: 11, 13, 15

मकर राशी
या राशीच्या लोकांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी प्रगती होणार आहे. तुम्ही या आठवड्यात तुमच्या प्रोजेक्टमध्ये खूप व्यस्त असणार आहे. हा आठवडा आर्थिक दृष्टिकोनातूनही उत्तम असेल. तुमचा खरेदीचा मूड असणार आहे. कुटुंबाच्या सहवासात आनंददायी वेळ घालविणार आहात.
शुभ दिवस: 13, 1

कुंभ राशी
या राशीचे लोक त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रगती करणार आहेत. स्त्रीच्या मदतीने जीवनात सुख-समृद्धी येणार आहे. आर्थिक बाबतीतही महिलांकडून खूप सहकार्य मिळणार आहे. मातृत्वाची स्त्री तुमच्या आयुष्यात आर्थिक समृद्धी आणणार आहे. या आठवड्यात प्रवास टाळा. अन्यथा थोडी निराशा होण्याची शक्यता आहे. तुम्हाला एकटेपणा जाणवणार आहे.
शुभ दिवस: 12, 15

मीन राशी
या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिक बाबतीत चांगला असणार आहे. आर्थिक दृष्टिकोनातूनही वेळ अनुकूल असून आर्थिक लाभ होणार आहे. कामाच्या ठिकाणी संवादाने प्रश्न सोडवले तर तुमच्या फायद्याचे असेल. या आठवड्यात तुम्ही तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या, अन्यथा मोठी समस्या निर्माण होऊ शकते. या आठवड्यात तुमच्या प्रवासादरम्यान कोणीतरी तुमची फसवणूक करु शकतो.
शुभ दिवस: 13, 17

Leave a Comment