अधिक श्रावण होता आणि पाठोपाठ निज श्रावण, तोही आता सरत आला. हा महिना महादेवाला समर्पित असल्यामुळे श्रावणातल्या शेवटच्या सोमवार दान करण्याची संधी दवडू नका.दान का? तर आपली संस्कृती ही समानतेचा पुरस्कार करते. दुसरा दुःखात असताना आपण आपला आनंद साजरा करू शकत नाही. तसे करणे विकृतीचे लक्षण ठरते. म्हणून संस्कृतिची शिकवण आहे, आपली ओंजळ भरली असेल तर त्यातून सांडून वाया जाण्याआधी दुसऱ्या गरजू व्यक्तीला ते दान करा. दान करताना देणाऱ्याला माज असू नये आणि घेणाऱ्याला लाज वाटू नये, हेही लक्षात ठेवा. दान कोणाला करायचे तर गरजू व्यक्तीला आणि कोणी कोणते दान करायचे याचे मार्गदर्शन ज्योतिष शास्त्रात दिले आहे, ते जाणून घेऊ.
मेष: मेष राशीचे लोक स्वभावाने तापट असल्याने त्यांनी या दिवशी दूध, दही, तूप, ताक यथाशक्ती दान करावे.
वृषभ : या राशीचा स्वामी ग्रह शुक्र असल्याने आपल्या क्षेत्रातील प्रगतीसाठी मंदिर, मठ, वृद्धाश्रम, अनाथाश्रमाला आर्थिक स्वरूपात दान करावे.
मिथुन: ज्योतिषशास्त्रानुसार मिथुन राशीच्या लोकांचा अधिपती ग्रह बुध आहे. या लोकांनी बुद्धीतेज लाभण्यासाठी लोणी किंवा तूप दान करावे.