10 सप्टेंबर अजा एकादशीला करा हे उपाय, मनोकामना होतील पूर्ण!

मित्रानो, पंचांगनुसार अजा एकादशी श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला साजरी केली जाते. त्यानुसार अजा एकादशी रविवार म्हणजे 10 सप्टेंबर रोजी आहे. एकादशी तिथी भगवान विष्णू यांना समर्पित आहे.

या दिवशी भगवान विष्णूंचे पूजन केल्याने माणसाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि दुःख आणि गरिबीपासून मुक्ती मिळते. या दिवशी विष्णू पूजनासह काही उपाय करणे खूप लाभदायक ठरतात. या उपायांनी व्यक्तीला शुभ फळ मिळू शकते. यामुळे व्यक्तीला आर्थिक संकटातून मुक्ती मिळू शकते. चला तर मग जाणून घेऊया या दिवशी करावयाच्या काही उपायांविषयी माहिती.

तुम्हाला आर्थिक चणचण जाणवत असेल तर दक्षिणावर्ती शंखाने भगवान विष्णूंचा अभिषेक करा. दक्षिणावर्ती शंखात माता लक्ष्मीचा वास असतो. अजा एकादशीच्या दिवशी शंखामध्ये कच्चे दूध आणि केशर टाकूण भगवान विष्णूंचा अभिषेक करा. यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होत तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल.

भगवान विष्णूचा आशीर्वाद आणि धनप्राप्तीसाठी अजा एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा. या उपायामुळे भगवान विष्णू प्रसन्न होत भक्तांच्या मनोकामना पुर्ण करतात.

अजा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या पूजेमध्ये चंदन आणि केशरचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी पिवळे चंदन आणि केशरमध्ये गुलाबपाणी मिसळून भगवान विष्णूला टिळक लावत पूजन करावे. याच वेळी हा टिळा स्वतःच्या कपाळावर देखील लावा. असे केल्याने तुमची सर्व कामे पूर्ण होईल आणि आर्थिक प्रगतीचा मार्ग मोकळा होईल.

ज्या दांम्पत्याला अपत्य नाही, अशांनी अजा एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर स्नान करून पिवळे वस्त्र परिधान करावे. यानंतर भगवान विष्णूची पूजा करावी. पूजेत पिवळी फुले अर्पण करावीत. पूजा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. असे केल्याने तुम्हाला संतती प्राप्त होईल आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील.

प्रयत्न करुनही तुमच्या व्यवसायात वाढ होत असेल तर अजा एकादशीच्या दिवशी नागवेलीचे पान घेऊन त्यावर ‘श्री’ लिहा. त्यानंतर ते पान भगवान विष्णूच्या चरणी अर्पण करावे. त्यानंतर काही वेळाने ते पान तुमच्या घराच्या तिजोरीत ठेवा. असे केल्याने तुमच्या व्यवसायात येणाऱ्या सर्व अडचणी दूर होत व्यवसायात वृद्धी होत उत्पन्न वाढू शकते.

Leave a Comment