Friday, September 22, 2023
Homeअध्यात्मभाऊ नसणाऱ्या बहिणी या 3 गोष्टींना बांधू शकतात राखी! सदैव मिळेल संरक्षण

भाऊ नसणाऱ्या बहिणी या 3 गोष्टींना बांधू शकतात राखी! सदैव मिळेल संरक्षण

मित्रानो,दसरा-दिवाळीप्रमाणेच रक्षाबंधनाचा सणही हिंदू धर्मात महत्त्वाचा मानला जातो. रक्षाबंधन दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेला साजरे केले जाते. यावर्षी अधिक मासामुळे श्रावण दोन महिन्यांचा आहे.

यंदा रक्षाबंधन 30 आणि 31 ऑगस्ट असे दोन दिवस साजरे केले जाणार आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी भद्राकाळ असल्याने राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त 30 ऑगस्ट रोजी रात्री 9:02 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 7:05 पर्यंत असेल. तसेच ज्या बहिणींना भाऊ नाही, अशा बहिणी कोणाला राखी बांधू शकतात, त्यांनी निराश होण्याची गरज नाही. राखी या 6 रोपांना बांधू शकता.

धार्मिक मान्यतेनुसार, जर तुम्हाला भाऊ नसेल तर तुम्ही कडुनिंब, वड, आवळा, केळी, शमी आणि तुळशीला राखी बांधू शकता.

त्रिदेव म्हणजेच ब्रह्मा विष्णू आणि महेश हे आवळा, कडुनिंब आणि वडामध्ये निवास करतात, असे मानले जाते. या झाडांना राखी बांधल्यास तिन्ही देवता खूप प्रसन्न होतात. तसेच तुळशीला राखी बांधल्यास देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि तुम्हाला कधीही आर्थिक संकटाचा सामना करावा लागत नाही. शमीच्या रोपाला राखी बांधल्यास महादेव प्रसन्न होऊन तुमचे रक्षण करतील.

केळीच्या झाडामध्ये भगवान विष्णू वास करतात, असे मानले जाते. केळीच्या झाडाला राखी बांधल्यास भगवान विष्णूचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहील.

रक्षाबंधनाच्या दिवशी बजरंगबलीला राखी बांधल्याने तुमच्या कुंडलीतील मंगळ दोषाचा नकारात्मक प्रभाव हळूहळू कमी होतो. हनुमानाला राखी बांधल्यानं बुद्धी प्राप्त होते आणि रागावर नियंत्रण मिळते, असे मानले जाते.

कलशाला राखी बांधणे खूप शुभ आहे, असे धार्मिक पुराणात सांगितले आहे. कलशाच्या मुखावर भगवान विष्णू, कलशाच्या कंठाच्या भागात भगवान शिव आणि कलशाच्या मूळ भागात ब्रह्मदेव वास करतात.

याशिवाय मातृशक्ती कलशाच्या मध्यभागी बसलेली असते. म्हणूनच जर तुम्ही पूजेच्या कलशाला राखी बांधली तर तुम्हाला सर्व देवी-देवतांचे आशीर्वाद मिळतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे.

RELATED ARTICLES

महाराष्ट्र

राजकीय घडामोडी

क्राइम

मनोरंजन