मित्रानो, रक्षाबंधन हा बहीण भावांच्या पवित्र नात्याचा सण आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधून त्याच्या दिर्घ आयुष्य व सुखाची प्रार्थना करते. 2023 म्हणजेच यंदा रक्षाबंधन काही दिवसांवर आली आहे.
मित्रानो आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सण उत्सव अगदी आनंदाने साजरे केले जातात. रक्षाबंधन हादेखील हिंदी धर्मामध्ये खूपच आनंदाने साजरा करतात. बहिण भावांचे अतूट नातं दर्शविणारा सन म्हणजेच रक्षाबंधन. तर यावर्षी रक्षाबंधन 30 आणि 31 तारखेला आलेली आहे. परंतु राखी नेमकी 30 तारखेला बांधायची की 31 तारखेला असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
रक्षाबंधनाच्या पवित्र क्षणाचा शुभ मुहूर्त काय आहे? भावाला राखी बांधताना कोणत्या चुका टाळाव्यात? यंदा रक्षाबंधनाचा मुहूर्त कोणता? जाणून घेणार आहोत.
यावर्षी 30 तारखेला सकाळी दहा ते ते रात्री नऊ वाजेपर्यंत भद्रा नक्षत्राचा काळ असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे या काळामध्ये राखी बांधणं अशुभ मानलं जातं. 31 तारखेला सकाळी 5 : 45 वाजलेपासून ते सकाळी 7 वाजेपर्यंत आपण हा सण साजरा करू शकतो. म्हणजे तुम्ही भावाला राखी बांधू शकता. भद्रा म्हणजे काय?भद्र काळात अशुभ काळ मानला जातो.
रावणाची बहीण शुर्पनखा हिने भद्रा चालू असताना भाऊ रावणाला राखी बांधली. त्यामुळे त्यांच्या कुळाचा नाश झाला. म्हणून हा काळ भद्र मानला जातो. भद्रा ही सूर्याची कन्या आणि शनि देवाची बहीण भद्र असल्याने तिला अशूभ मानतात, असे पेठकर गुरूजींनी सांगितले.रक्षाबंधनाच्या दिवशी कोणत्या चुका टाळाव्यात?रक्षाबंधनाच्या दिवशी बांधली जाणारी राखी पूर्ण प्लास्टिकची नसावी. तुटलेली किंवा खंडीत नसावी. काळ्या रंगाच्या धाग्यात नसावी. त्यावर अशुभ चिन्ह नसावे.
मनगटाच्या वर खूप मोठी राखी नसावी. भद्रकाळात राखी बांधू नये. तसेच बहीण भावांनी काळे कपडे परिधान करू नये, सोबतच भेट देताना काचेची किंवा तुटलेली वस्तू, काळे कपडे देऊ नये असे सांगतात.
भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही या सणामागची मंगल मनोकामना असते.त्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. चुका टाळून मोठ्या उत्साहात रक्षाबंधन साजरा करावा. बहीण भावांच्या नात्याला वृद्धिंगत करणाऱ्या या सणाला धार्मिक आणि अध्यात्मिक महत्त्व आहे.