Wednesday, September 27, 2023
Homeराशी-भविष्यआजपासून ‘या’ राशींवर पडणार पैशांचा पाऊस! चमकून उठेल भाग्य

आजपासून ‘या’ राशींवर पडणार पैशांचा पाऊस! चमकून उठेल भाग्य

मित्रानो,ज्याप्रमाणे प्रत्येक ग्रह वेळोवेळी गोचर करतो, मार्ग बदलून अन्य राशीत प्रवेश करतो तसेच त्या ग्रहांची शक्ती सुद्धा कमी जास्त होत असते. ज्योतिषशास्त्रात शनीला विशेष महत्त्व आहे. शनी हा सर्वशक्तिशाली ग्रह म्हणून ओळखला जातो. २०२३ हे वर्ष शनी प्रभावाचे वर्ष आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच शनीने कुंभ राशीत प्रवेश घेतला होता तर आता ४ नोव्हेंबर शनिदेव वक्री होणार आहेत.

जेव्हा एखादा ग्रह १ ते १० अंश कोनात असतो आणि विषम राशीत उपस्थित असतो तेव्हा त्याला जागृत अवस्था म्हटले जाते. न्यायदेवता शनी सध्या विषम म्हणजेच ११ क्रमांकाच्या कुंभ राशीत जागृत झाले आहेत. याचा प्रभाव सर्वच राशींवर कमी अधिक प्रमाणात दिसून येणार आहे. पण त्यातही चार अशा राशी आहेत ज्यांच्या कुंडलीत सर्वाधिक लाभ लिहिलेला दिसून येत आहे. या नशीबवान राशी कोणत्या हे पाहूया.

मेष रास
शनीच्या जागृत अवस्थेत मार्गक्रमणाने मेष राशीचे अच्छे दिन सुरु होऊ शकतात. या मंडळींना इच्छापूर्तीचा अनुभव मिळू शकतो. नोकरीच्या ठिकाणी पदोन्नती ते पगारवाढ असे दुप्पट व अनपेक्षित लाभ तुमच्या कुंडलीत दिसत आहेत. तुमच्या कामाचा वेग वाढेल, मरगळ निघून जाईल. समाधानी राहण्यासाठी प्रेत करा पण कामात कंटाळा करू नका. बेरोजगार मंडळींना नोकरीची आयती सुवर्ण संधी चालून येऊ शकते.

वृषभ रास
वृषभ राशीचे स्वामी शुक्र आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र व शनी हे मित्र ग्रह आहेत. यामुळेच शनिदेव वृषभ राशीवर नेहमीच प्रसन्न असतात. हा येणारा कालावधी सुद्धा आपल्याला असाच लाभदायक ठरू शकतो. शनिदेव तुमच्या कुंडलीत आकस्मिक धनलाभ देऊन जातील. आपली थांबलेली कामं मार्गी लागल्याने पैशाचा प्रवाह वाढता राहील. नवीन नोकरीची संधी मिळू शकते. कोणालाही शब्द देणे टाळावे.

मिथुन रास
मिथुन राशीचे भाग्य सुद्धा शनिदेव जागृत झाल्यामुळे अधिक उजळणार आहे. शनी तुमच्या नशिबाला व व्यक्तिमत्वाला वेगळी झळाळी देऊ शकतो. आपल्याला बहुप्रतीक्षित यात्रेसाठी जाण्याची सुद्धा संधी लाभू शकते. परदेशी शिक्षण व नोकरीसाठी जाऊ इच्छिणाऱ्यांना नशिबाचे व वेळेचे पाठबळ लाभेल. तुमचे आर्थिक स्रोत व कक्षा रुंदावू शकतील.

तूळ रास
शनिदेवाची जागृत स्थिती तूळ राशीसाठी अनुकूल सिद्ध होऊ शकते. शनी महाराज आपल्याला सुख- सुविधा प्रदान करू शकतात. प्रॉपर्टी व वाहन खरेदीच्या बाबत सुद्धा तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. समाजातील मान- सन्मान वाढून प्रतिष्ठा अनुभवता येऊ शकते. घरातील ज्येष्ठ मंडळींचा सहवास लाभेल आणि त्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वात अनेक उत्तम बदल घडून येऊ शकतात.

RELATED ARTICLES

महाराष्ट्र

राजकीय घडामोडी

क्राइम

मनोरंजन