मित्रांनो, मंदिरात दररोज पूजा होत असते आरती होत असते त्यावेळी देवाला काही फुले हार वाहिली जातात. काही लोक मंदिरात हार फुल घेऊन देवाला वाहतात. जर मंदिरात आपल्याला फूल किंवा हार मिळाले तर त्याचे काय करावे हे अनेक लोकांना माहीत नसते. अनेक लोक फुले हार घेऊन घरी येतात आणि तसेच ठेवतात पण तसं न करता हे फूल किंवा आहाराचे काय करायचे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. देवाला वाहलेली हार फुल जर आपल्याला मिळाले तर ते खूप चांगले असते.
आपण जेव्हा कुलदेवतेला जातो त्यावेळी आपण नारळ वगैरे सगळं घेऊन जातो नंतर तिथे आपल्याला काही फुले हार किंवा नारळ दिले जातात. आपल्याला बऱ्याच का कळत नाही याचे काय करावे. मंदिरातील ब्राम्हण आपल्याला काही फुले हार नारळ देत असतात ते आपण आशीर्वाद म्हणून घेतो. हार फुल नारळ घेऊन घरी आल्यावर ते देवाला समोर ठेवतात तर काही लोकांना कळत नाही की ते फुल हार नदीत व्हायचे कि काय करायचे. काही लोकांना अशुभ होण्याची भीती असते त्यामुळे ते फेकून देण्याचा प्रयत्न देखील करत नाही.
चला तर मग जाणून घेऊया मंदिरात वाहलेले फुल आपल्याला मिळाले तर त्याचे काय करायचे. जर मंदिरात आपल्याला देवाला वाहिलेले फूल दिले असतील तर ते आपण आपल्या घरी आणून आपल्या तिजोरीत म्हणजेच जिथे आपण पैसा ठेवतो त्या ठिकाणी एका कपड्यात बांधून ठेवावे.
जे मिळालेले फुल आहे ते कधीच कुजत नाही ते तिथेच वाळतात. आपण काही वेळा यात्रेला जातो यात्रेत गेल्यानंतर देवाला वाहालेले फुल हार अनेक काही गोष्टी आपल्याकडे असतात. आणि आपण यात्रेसाठी गेलो तर तिथे वस्ती होती. मग आपल्याला कळत नाही की या गोष्टींचे काय करावे.
त्यासाठी आपण एक उपाय करायचा. ते जे मिळालेले फुल आहे ते आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर घेऊन त्या फुलाचा वास घ्यायचा आहे. मग ते फूल हार असेल ते एका झाडाखाली किंवा वाहत्या पाण्यात सोडून द्यायचे आहे. फुलाचा वास घेतल्याने आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. मग ते फूल तुम्ही स्वतःकडे ठेवायची काही गरज नाही. आपण अनेकदा पाहतो की मंदिराच्या बाहेर एक ठेवलेला असतो त्यामध्ये आपण ते फुल ठेवले तरी चालेल. प्रवासात आणि मंदिरात मिळालेले फुल आपण वाहत्या पाण्यात सोडले तरी चालेल.
यामुळे तुम्हाला त्या फुलाबद्दल किंवा आहाराबद्दल कोणतीच प्रश्न मनामध्ये निर्माण होणार नाहीत. प्रवासात असेल किंवा आपण बाहेर कुठे गेल्यानंतर आपल्याला जर हार-फुले मिळालेले असेल तर त्याचा वास घेऊन नदीत तलावात एका झाडाखाली ठेवा ते फूल आपल्या सोबत ठेवायची काहीच गरज पडणार नाही.