Wednesday, September 27, 2023
Homeअध्यात्मकर्ज, आर्थिक अडचणी, व्यवसायात होणारे नुकसान यातून होईल सुटका! फक्त करा हे...

कर्ज, आर्थिक अडचणी, व्यवसायात होणारे नुकसान यातून होईल सुटका! फक्त करा हे प्रभावशाली उपाय!

मित्रांनो आपल्यापैकी बऱ्याच जणांना कर्जाचे ओझे इतके होते की ते कर्ज पेडणे शक्य होत नाही. त्यामुळे आपल्याला खूपच त्रास सहन करावा लागतो. खूपच टेन्शन येते तसेच घरामध्ये काही ना काही अडीअडचणी असल्यामुळे पैशाची टंचाई जाणवते. म्हणजेच काही आर्थिक अडचणी असल्यामुळे घरातील वातावरण शांततेचे राहत नाही.

नवीन एखाद्या व्यवसाय चालू केला तरी त्यामध्ये होणारे नुकसान यामुळे देखील आपण दिवसेंदिवस चिंतेत राहतो आणि त्यावेळेस आपल्याला काय करावे हे सुचत नाही. आपण अनेक ज्योतिषीय उपाय देखील करीत असतो. परंतु काही वेळेस त्याचा देखील फायदा आपल्याला होत नाही. तर आज मी तुम्हाला असे काही प्रभावशाली उपाय सांगणार आहे हे उपाय जर तुम्ही केला तर तुमची कर्जातून सुटका होणार आहे.

ज्या काही आर्थिक अडचणी असतील, व्यवसायात जर नुकसान होत असेल तर हे सर्व काही दूर होणार आहे. फक्त ते मनोभावेने श्रद्धेने विश्वास ठेवून तुम्ही हे उपाय करायचे आहेत. तर हे प्रभावशाली उपाय नेमके कोणते आहेत चला तर मग सविस्तर जाणून घेऊयात.

ज्योतिष शास्त्रानुसार जर तुम्हाला व्यवसायामध्ये खूप सारे नुकसान होत असेल म्हणजेच व्यवसायमधून आपल्याला नफा प्राप्त होत नसेल तर तुम्ही पावसाचे पाणी एखाद्या पितळेच्या भांड्यामध्ये जमा करायचे आहे आणि एकादशीच्या दिवशी या पाण्याने लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना अभिषेक करायचा आहे. यामुळे तुम्हाला व्यवसायामध्ये होणारे नुकसान टाळता येईल आणि व्यवसायामध्ये तुम्हाला फायदा होईल आणि तुम्ही प्रगतीच्या दिशेने वाटचाल देखील कराल.

जर तुम्हाला कर्जाचे ओझे खूपच झाले असेल म्हणजेच कर्ज काही केल्याने फिटत नसेल तर तुम्ही पावसाचे पाणी एखाद्या भांड्यात साठवून ठेवायचे आहे आणि ते तुम्हाला हनुमानाला अर्पण करायचे आहे आणि श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला हनुमान स्त्रोत देखील बोलायचे आहे. म्हणजेच हनुमान स्त्रोत बोलून तुम्ही हनुमानाला हे पावसाच्या पाणी अर्पण करायचे आहे आणि हा उपाय तुम्ही मंगळवारी किंवा शनिवारी देखील करू शकता.

यामुळे तुमची कर्जाचे ओझे नक्कीच दूर होईल. तसेच तुम्हाला सतत आर्थिक टंचाई जाणवत असेल म्हणजेच आर्थिक संकटे सतत येत असतील तर तुम्ही पावसाचे पाणी एखाद्या मातीच्या भांड्यात गोळा करून ते घराच्या उत्तर दिशेला ठेवावे. असे केल्याने तुमची आर्थिक समस्या दूर होईल.

ज्योतिषशास्त्रानुसार पैशाची कमतरता दूर करण्यासाठी पावसाचे पाणी पातेल्यात जमवावे. ज्या सकाळी पाऊस नसेल आणि सूर्यदर्शन होईल त्यावेळी हे पाणी सूर्यप्रकाशात ठेवून, इष्टदेवतेचे नाव घेऊन घरात शिंपडावे. यामुळे लक्ष्मी मातेची कृपा होईल.

RELATED ARTICLES

महाराष्ट्र

राजकीय घडामोडी

क्राइम

मनोरंजन