मित्रांनो श्रावण महिन्यातील आज पहिला सोमवार. श्रावण महिना हा खूपच पवित्र महिना मानला जातो आणि श्रावण सोमवारचे व्रत प्रत्येक जण अगदी मनोभावे आणि श्रद्धेने करीत असतात. सोमवार हा महादेवांना समर्पित आहे. त्यामुळे तुम्ही सोमवारी महादेवांची पूजा करून त्यांच्या पिंडीवरती अभिषेक देखील करावा. यामुळे आपल्या काही इच्छा असतील तर या इच्छा महादेव नक्कीच पूर्ण करतात.
त्यांची कृपा आपल्यावर कुटुंबीयांवर सदैव ठेवत असतात. तर तुम्ही श्रावण सोमवारचा उपवास केला असेल तर तुम्ही श्रावण सोमवारी महादेवांना हा एक नैवेद्य अवश्य दाखवायचा आहे. पहिल्या श्रावण सोमवारी तुम्ही महादेवांना हा नैवेद्य दाखवला तर तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी भरभराट होईल. तर आपल्याला पहिल्या श्रावण सोमवारच्या दिवशी नेमका कोणता नैवद्य दाखवायचा आहे जाणून घेऊया.
आपल्यापैकी बऱ्याच जणांचा श्रावण सोमवारचा उपवास असतो आणि त्यामुळे आपण संध्याकाळी आपला उपवास सोडत असतो व त्यावेळेस आपण संध्याकाळी जे काही अन्न शिजवतो त्याचा नैवद्य आपण महादेवांना दाखवत असतो. परंतु पहिल्या श्रावण सोमवारी महादेवांना तुम्ही हा विशेष नैवेद्य दाखवला तर महादेव प्रसन्न होतात आणि ते आपल्याला भरभराटीचा अवश्य आशीर्वाद देतात.
तर पहिल्या श्रावण सोमवारी तुम्ही देवघरात जाऊन शिवलिंगाचे दर्शन घ्यावे आणि शिवलिंगाची पूजा करायची आहे. तसेच वाटीमध्ये थोडीशी दूध आणि साखर घेऊन पण महादेवाला अर्पण करा. कारण महादेवाला दूध अत्यंत प्रिय असते त्यामुळे तुम्ही नैवेद्य म्हणून महादेवांना दूध ठेवले तरीही चालेल.
संध्याकाळी तुम्ही सफेद रंगाचे पेढे किंवा सफेद रंगाची कोणतीही मिठाई आणू शकता आणि ती तुम्ही महादेवांना नैवेद्य म्हणून दाखवायचे आहे. तसेच तुम्ही महादेवांना पंचामृत बनवून देखील त्याचा नैवेद्य दाखवू शकता. तसेच तुम्ही पहिल्या श्रावण सोमवारी खीर करून त्याचा नैवेद्य दाखवू शकता. म्हणजे तुम्ही पहिल्या श्रावण सोमवारी दूध साखर, पंचामृत, सफेद रंगाची कोणतीही मिठाई किंवा खीर यापैकी कोणताही नैवेद्य महादेवांना दाखवू शकता.
यामुळे महादेव आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपल्याला सुख समृद्धी ऐश्वर्याची प्राप्ती देखील होईल. तर तुम्ही देखील श्रावणातील पहिल्या सोमवारी महादेवांना याचा नैवेद्य अवश्य दाखवा.