मित्रानो प्रत्येक ग्रह आपले स्थान सतत बदलत असतात. त्यांचा प्रभाव प्रत्येक राशींचा लोकांवर दिसून येतो.तर ग्रहांचा राजा सूर्य गोचरने तब्बल एक महिन्यानंतर स्वगृही सिंह राशीत प्रवेश केला आहे. आता आज ग्रहांचा सेनापती मंगळ दुपारी 3:14 वाजता कन्या राशीत प्रवेश करणार आहे.
धैर्य, पराक्रम, जमीन आणि विवाहाचा कारक मंगळाच्या संक्रमणामुळे 12 राशींवर याचा चांगला आणि वाईट परिणाम दिसून येणार आहे. 3 ऑक्टोबरपर्यंत मंगळ कन्या राशीत असणार आहे. मंगळ गोचर हा काही राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे. यात तुमची रास आहे का? जाणून घ्या
मेष राशी
या राशींसाठी मंगळाचं स्थान परिवर्तन अतिशय भाग्यशाली ठरणार आहे. येत्या 3 ऑक्टोबरपर्यंतचा काळ यांच्यासाठी यश घेऊन आला आहे. छुप्या शत्रूंचा ते खात्मा करणार आहात. न्यायालयीन प्रकरणात तोडगा निघणार आहे. नशिबाची साथ काय असतं ते या दिवसांमध्ये कळणार आहे. कामात यश आणि प्रगती या दुहेरी गोष्टींचा आनंद तुम्हाला कळणार आहे. मात्र या दिवसांमध्ये रागावर मात्र नियंत्रण ठेवा. आर्थिक स्थिती चांगली होणार आहे.
मिथुन राशी
या राशीसाठी मंगळ ग्रह सुखाचे दिवस घेऊन आला आहे. व्यवसायिकांसाठी सुवर्ण काळ असणार आहे. मोठे करार होणार असल्याने धनलाभ होणार आहे. नोकरीत यश प्राप्त होणार आहे. घरातील वातावरण आनंदी असल्याने तुम्ही प्रसन्न असणार आहात. घरातील समस्यावर तुम्ही सहज तोडगा काढण्यात यशस्वी होणार आहात.
कर्क राशी
या राशीच्या लोकांसाठी मंगळ गोचर अतिशय फलदायी ठरणार आहे. ओळखीच्या किंवा जवळच्या व्यक्तीची तुमची भेट होणार आहे. स्पर्धा परीक्षा किंवा उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मंगळ गोचर मंगल करणार आहे. शत्रूंवर विजय मिळवणार आहात.
वृश्चिक राशी
मंगळ गोचर या राशीच्या लोकांसाठी शुभ सिद्ध होणार आहे. 3 ऑक्टोबरपर्यंत यांच्या मनात येणाऱ्या इच्छा सहज पूर्णत्वाला जाणार आहे. समाजात तुमचा वावर वाढणार आहे. त्यामुळे लोकांसाठी तुम्ही जास्त जास्त कनेक्ट होणार आहात. त्यातून भविष्यात तुम्हाला फायदा होणार आहे. विरोधकही या काळात तुमचे मित्र होणार आहेत. आर्थिक स्थिती चांगली होणार असून कर्जमुक्त होणार आहात.
धनु राशी
धनु राशीच्या लोकांसाठी मंगळ गोचर अतिशय मंगलमय सिद्ध होणार आहे. कार्यक्षेत्रातील प्रगती तुम्हाला उंच शिखरावर घेऊन जाणार आहे. नोकरीची नवीन संधी चालून येणार आहे. आत्मविश्वास वाढणार आहे. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवणार आहात.