ज्योतिषशास्त्रानुसार आज म्हणजेच १७ ऑगस्टचा दिवस हा अत्यंत खास आहे, आज १ वर्षानंतर सूर्यदेव पहिल्यांदाच स्वतःच्या राशीत म्हणजेच सिंहमध्ये प्रवेश घेत आहेत. सूर्याचे सिंह राशीतील गोचर हे काही राशींच्या भाग्यात अत्यंत महत्त्वपूर्ण बदल घेऊन येणार आहेत. सिंह राशीत आधीपासूनच बुध देव उपस्थित आहेत. सूर्य व बुधाच्या एकत्र येण्याने आज बुधादित्य राजयोग निर्माण होईल.
या राजयोगाचा प्रभाव चार राशींवर अत्यंत शुभ रूपात दिसून येऊ शकतो. सूर्याच्या राशीत बुधादित्य राजयोग बनल्याने प्रभावित राशींना राजासारखे आयुष्य जगता येऊ शकते. धन- धान्य, आरोग्य व मानसिक समाधान या चारही बाजूंनी समृद्ध होऊ शकतील अशा राशी कोणत्या हे पाहूया.
मेष रास
मेष राशीसाठी सूर्याचे गोचर हे अत्यंत लाभदायक सिद्ध होऊ शकते. आपले कामातील लक्ष वाढेल परिणामी तुमच्या हस्ते होणाऱ्या कामांचा वेग व गुणवत्ता सुद्धा वाढू शकते. याचा थेट प्रभाव पगार व पदोन्नतीवर झाल्याने तुम्हाला कामाच्या ठिकाणी माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळू शकतो. आर्थिक मिळकत वाढल्याने मनाचा ताण सुद्धा कमी होऊ शकतो. प्रेमसंबंध सुधारतील.
मिथुन रास
सूर्याचे राशी परिवर्तन मिथुन राशीच्या मंडळींचा आत्मविश्वास वाढवू शकते. आपले संबंध सुधारतील बोलण्यात शांतता व मार्दव वाढेल त्यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षितहोतील . तुम्हाला जोडलेल्या माणसांकडूनच एखादी मोठी प्रगतीची संधी मिळू शकते. तुमच्या कामाचे कौतुक होईल,शेअर मार्केट व बँकांमधील सुरक्षित गुंतवणुकीवर अधिकधिक भर दिल्यास धनलाभ होऊ शकतो.
तूळ रास
तूळ राशीच्या लोकांसाठी सूर्याचे गोचर नशिबाला साथ देत होणार आहे. तुमच्या कामाचा वेग वाढेल, अडकून पडलेले पैसे परत मिळतील. आर्थिक मिळकतीचे अनपेक्षित स्रोत वाढतील. आरोग्यात सुधारणा होईल व जुनाट आजार दूर होतील. पती- पत्नीचे नाते आणखीनच घट्ट होण्याची शक्यता आहे.
वृश्चिक रास
वृश्चिक राशीसाठी सुद्धा सूर्याचे गोचर अत्यंत शुभ सिद्ध होऊ शकते. आपल्याला कामाच्या ठिकाणी नवनवीन संधी प्राप्त होतील. तुमच्यावर विश्वास टाकला जाईल जेणेकरून तुमचे धैर्य सुद्धा वाढेल. बिनधास्त बोलायला सुरुवात करा पण संयम सोडू नका. तुमच्या कामावर पडलेल्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवणे टाका जेणेकरून भविष्यात तोंडघशी पडण्याची वेळ येणार नाही.