मित्रानो, ज्योतिषशास्त्रात मंगळाला खूप महत्त्व आहे. त्याला ऊर्जा आणि सामर्थ्याचा घटक मानले जाते. भारतीय ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळ मेष आणि वृश्चिक राशीचा स्वामी आहे. सूर्य, चंद्र आणि बृहस्पति हे त्याचे मित्र ग्रह मानले जातात. मंगळ हा आक्रमकता, उत्साह, धैर्य, शक्ती, उर्जा, जमीन आणि विवाह यांचा कारक मानला जातो. मंगळच्या स्थितीवर अनेक राशींच्या लोकांना व्यापार, कार्यक्षेत्र आणि धनसंपत्तीमध्ये लाभ होतो. त्यामुळे लवकरच मंगळ ग्रहामुळे काही राशींना त्यांचा मेहनतीचं फळ मिळणार आहे.
१८ ऑगस्ट २०२३ रोजी मंगळ कन्या राशीत प्रवेश करणार आहे. मंगळाचे संक्रमण काही राशींसाठी फलदायी ठरु शकते. यासोबतच बुधही कन्या राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे कन्या राशीत मंगळ आणि बुध यांच्या संयोगामुळे काही राशींच्या लोकांसाठी हा काळ खूप चांगला ठरु शकतो. कामात यश मिळू शकते. तसेच धनलाभही होऊ शकतो, चला तर पाहूया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…
मेष राशी
मंगळाचे संक्रमण मेष राशीच्या लोकांना खूप लाभदायक ठरु शकते. तुमच्या शत्रूंचा तुमच्याकडून पराभव होऊ शकतो. कोणताही खटला किंवा वाद चालू असेल तर त्यात विजय मिळू शकतो. कोणतेही महत्त्वाचे काम यशस्वी होऊ शकते. जर तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवून संयमाने वागलात तर हा काळ तुम्हाला खूप लाभ देऊ शकतो. उत्पन्नही वाढू शकते.
मिथुन राशी
मंगळाचे भ्रमण मिथुन राशीच्या लोकांना व्यवसायात लाभ देऊ शकते. तुमचा व्यवसाय वाढून तुमच्या नफ्यात वाढ होऊ शकते. तुमच्या करिअरमध्ये अपेक्षित यश मिळू शकतो. लाभाच्या संधी मिळू शकतात. कौटुंबिक जीवन आनंदी राहू शकतो.
कर्क राशी
कर्क राशीच्या लोकांसाठी मंगळाचे गोचर पैसे कमावण्याच्या अनेक संधी घेऊन येणारे ठरु शकते. नोकरीत प्रमोशन मिळू शकते. नोकरीच्या माध्यमातून परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. करिअरमध्ये खूप पुढे जाऊ शकता. आरोग्यही चांगले राहू शकते.
वृश्चिक राशी
हा काळ वृश्चिक राशीच्या मंडळीसाठी भाग्योदय करून देणारा ठरु शकतो. तुमचे नशिबाचे दरवाजे उघडू शकतात. या राशीतील लोकांसाठी प्रमोशन, उत्तम नोकरी, वेतनवाढ होण्याचे योग आहेत. बँक-बॅलन्स वाढू शकतो. मुलांकडून आनंदाची बातमी मिळू शकते.