मित्रांनो आपल्यापैकी बरेच जण हे स्वामी समर्थांचे भक्त सेवेकरी आहेत. अनेक सेवा स्वामींच्या आपणाला केंद्रामध्ये सांगितल्या जातात आणि आपण अगदी मनोभावे श्रद्धेने त्या सेवा करीत असतो. जेणेकरून आपल्या जीवनातील सर्व दारिद्र्य, अडचणी, दुःख दूर होतील. स्वामी हे आपल्या भक्तांच्या पाठीशी कायम उभे असतात. त्यांना अडचणीतून मार्ग देखील ते दाखवत असतात.
मित्रांनो आपल्या घरामध्ये स्वामींची मूर्ती किंवा फोटो असणे खूपच शुभ मानले जाते. तसेच जर तुम्हाला केंद्रांमध्ये जाणे शक्य नसेल तर तुम्ही स्वामींच्या मूर्ती समोर किंवा फोटोसमोर बसून स्वामींच्या सेवा करू शकता. स्वामींच्या मंत्राचा जप देखील करू शकता. तर आज मी तुम्हाला सोमवारची स्वामींची विशेष अशी सेवा सांगणार आहे. ही सेवा तुम्हाला संध्याकाळच्या वेळेस ज्यावेळेस तुम्ही दिवा अगरबत्ती करता त्यावेळेस ही सेवा करायची आहे.
या सेवेमध्ये आपणाला स्वामींच्या एका चमत्कारिक मंत्राचा जप करायचा आहे. मित्रांनो संध्याकाळच्या वेळेस हात पाय स्वच्छ धुवून स्वामींच्या मूर्ती समोर किंवा फोटोसमोर बसायचे आहे. दिवा अगरबत्ती करायची आहे. स्वामींना नमस्कार करायचा आहे. ज्या काही इच्छा तुमच्या असतील त्या स्वामींना बोलायचे आहेत. तसेच काही अडचणी असतील तर त्या स्वामींना सांगायचे आहेत आणि यानंतर तुम्हाला या मंत्राचा जप 108 वेळा करायचा आहे. तर मित्रांनो हा मंत्र काहीसा असा आहे.
ओम चितशक्यात्मने नम:
तरी या मंत्राचा जप तुम्हाला 108 वेळा करायचा आहे आणि यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप देखील करायचा आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे हे मंत्र जप तुम्ही जर केला तर तुमच्या इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील. तुमच्या सर्व अडीअडचणी दूर करतील आणि तुम्हाला योग्य तो मार्ग दाखवतील.
सदैव स्वामींचा आशीर्वाद तुमच्या कुटुंबीयांवर राहील. तुमच्या प्रगतीमध्ये येणारे सर्व अडथळे दूर होतील आणि तुम्हालाही नक्कीच प्रत्येक कामांमध्ये यश मिळत राहील. यामुळे तुम्हाला शंभर टक्के फरक जाणवेल आणि तुमच्या इच्छा नक्कीच स्वामी महाराज पूर्ण करतील.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.