प्रियांका चोप्राने लाडक्या लेकीचं नाव ‘मालती मेरी’च का ठेवलं?

लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने आपल्या अभिनयाने फक्त हिंदीतच नाही तर हॉलिवूडवरही आपली छाप पाडली. तिने आपल्या प्रत्येक भूमिकेत जीव ओतला. नकारात्मक असो किंवा सकारात्मक तिची प्रत्येक भूमिका गाजली. बॉलिवूडनंतर तिने आपला मोर्चा हॉलीवूडकडे वळवला. २०१८ साली तिने निक जोनासशी लग्नगाठ बांधली. त्यानंतर तिने २०२२ मध्ये एका मुलीला जन्म दिला. वेळेआधीच जन्मलेल्या आपल्या मुलीला तिने फुलाच्या पाकळीसारखं जपलं.

जेव्हा तिचं नाव ठेवायची वेळ आली तेव्हा मात्र प्रियांकाने फार विचार करून निर्णय घेतला. आपल्या लाडक्या लेकीचं नाव तिने मालती मेरी ठेवलं. तिच्या या निर्णयानंतर तिचं नेटकऱ्यांकडून फार कौतुक झालं. मात्र आता तिने तिच्या या निर्णयामागचं कारण सांगितलं आहे.

प्रियांकाने तिच्या मुलीचं नाव मालती मेरी ठेवल्याने तिचं सोशल मीडियावर कौतुक झालं होतं. तिने दोन्ही धर्मांचा मान ठेवत आपलं वेगळपण जपलं असं म्हटलं गेलं. तिच्या नावाने सगळेच खुश झाले. अनेकांनी तिच्या मुलीच्या नावाचा अर्थ शोधला. मालती या शब्दाचा अर्थ सुगंधित फुल होतो तर मेरी म्हणजे चंद्राचा प्रकाश. मात्र तिने आपल्या मुलीसाठी हीच नावं का निवडली याचं कारण तिने आता सांगितलं आहे.

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत निवेदिकेने तिच्या मुलीच्या नावाचं कौतुक केलं. असं आगळंवेगळं नाव ठेवावंसं का वाटलं असं विचारल्यावर ती म्हणाली, ‘भारतात आपल्या आजी- आजोबांवरून नावं ठेवण्याची पद्धत आहे. ती खूप नशीबवान आहे की तिला आजी- आजोबा आहेत. तिचं नाव तिच्या दोन्ही आजींच्या नावावरून बनलं आहे. माझ्या आईचं नाव मालती आहे आणि निकच्या आईचं नाव मेरी आहे. त्यामुळे तिचं नाव मालती मेरी चोप्रा जोनस असं ठेवलं आहे.’

प्रियांकाचं हे उत्तर ऐकून आता नेटकरीही तिचं कौतुक करत आहेत. इथे इतर बॉलिवूड सेलिब्रिटी त्यांच्या मुलांना दाक्षिणात्य पद्धती शिकवत आहेत तिथे प्रियांका भारतीय पद्धती जपण्याचा प्रयत्न करत आहे असं म्हणत तिचं कौतुक करत आहेत.

अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment