आजची सोमवारची स्वामींची विशेष सेवा! मनोभावे स्वामींचा हा मंत्र बोला

मित्रांनो, स्वामींच्या नामस्मरणामधे खूप मोठी शक्ती आहे. आज आम्ही तुम्हाला स्वामींचा असा एक मंत्र सांगणार आहे. त्या मंत्राच्या जपामुळे तुम्हाला पाहिजे त्या सर्व गोष्टी मिळतील..

सर्व कामे तुमच्या मनासारखी होतील. तहानलेला याचक स्वामींना पाण्याच्या थेंबाची याचना करतो. तेव्हा स्वामी त्यांना पाण्याने तुडुंब भरलेला महासागर देतात.परंतु आपल्या पदरी तेवढेच असते जेवढे आपल्या पात्राचे माप असते. म्हणून आपल्याला आपल्या पात्रावर काम करायचे आहे.

जर पात्राचे आकारमान वाढवायचे असेल. त्यासाठी आपल्याला आपली वृद्धि व श्रद्धेची शक्ती कामी आणायला पाहिजे. त्याचा वापर आपल्याला करायचा आहे. विशेष म्हणजे स्वामी स्वतः यासाठी आपल्याला मदत करत असतात. कधीही वाईट विचार करू नका. कोणाच्याही बाबतीमध्ये आपण नेहमीच चांगला विचार केला पाहिजे.

त्यांनी आपल्या बद्दल काहीही विचार करू द्या आपण नेहमी चांगलाच विचार करावा. तुम्हाला कोणीही कधीही काहीही बोलू द्या. तुम्ही त्यांच्याबद्दल वाईट बोलू नका. कारण हिशोब ठेवणारा वरून सर्व काही पाहत असतो.

तो पाहत असतो की तुम्ही दुसऱ्याबद्दल काय विचार करता आणि दुसरे तुमच्याबद्दल काय विचार करतात. म्हणून आपल्याला जेवढी भक्ती साठवता येईल तेवढी भक्ती साठवावी, अनुभवावी. ती भक्तीच आपली शक्ती असते.

आणि तीच पुढे जाऊन आपल्या उपयोगाला येते. म्हणून स्वामींचे चिरंतन नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ या स्वामींच्या मंत्राचा जप करा. स्वामींचा एक मंत्र तुम्ही दररोज रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्यावर म्हणा.

याची प्रचिती म्हणून स्वामी तुमच्या सदैव पाठीशी उभे राहतील. तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करतील. कोणतीही अडचण असू द्या या मंत्राच्या उच्चाराने ती अडचण दूर होईल. तर या मंत्राचा तुम्ही देखील अवश्य जप करा.

Leave a Comment