स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती असेल तर ही गोष्ट न विसरता नक्की करा!

मित्रांनो आपण सगळे स्वामी भक्त आहोत. आणि आपल्या सर्वांनाच त्यांची सेवा करण्याची त्याची भक्ती करण्याची खूप आवड आहे. आपल्या पैकी प्रत्येक जण आपापल्या परीने आणि जमेल तसे स्वामींची सेवा करण्याचा प्रयत्न करतो. आणि अजूनही बरेच स्वामीभक्त स्वामींची सेवा करू इच्छितात, आणि त्यांची अशी इच्छा असते की आपण एखादा असा छानसा फोटो स्वामींचा विकत घ्यावा. आपल्या घरामध्ये किंवा देवघरामध्ये लावावा. परंतु आपल्यापैकी बऱ्याच लोकांना म्हणजेच स्वामीभक्तांना नेहमी प्रश्न पडतो, तो म्हणजे की घरात ठेवण्यासाठी स्वामींचा कोणता फोटो विकत घ्यावा.

मित्रांनो फोटो कसा असावा व फोटो कोणत्या दिशेला लावावा. असे अनेक प्रश्न आपल्या मनात येतात. तर मित्रांनो जेव्हा तुम्ही फोटो घ्यायला जाल, तेव्हा एक असा स्वामींचा फोटो बघा जो रेखीव असला पाहिजे तो फोटो तुमच्याशी बोलणार असला पाहिजे. तर तो फोटो तुम्हाला दिव्य दर्शन देणारा असला पाहिजे. स्वामीभक्तहो जेव्हा तुम्ही फोटो घेणार असाल, जेव्हा फोटो तुम्ही निवडणार असाल, तेव्हा तुम्ही सगळे फोटो एकदा निरखून पहा. आणि कोणत्या फोटोमधून तुम्हाला साक्षात स्वामींचे दर्शन झाल्यासारखे वाटते ते बघा. कोणता फोटो तुम्हाला काहीतरी बोलतोय अस वाटतय तो फोटो बघा.

मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे की तुम्ही स्वामींचा कोणताही फोटो घ्या. पण त्या फोटोमध्ये श्री स्वामी समर्थ महाराज बसलेले असायला पाहिजेत. ज्या फोटोमध्ये स्वामी उभे आहेत. असा फोटो तुम्हाला घ्यायचाच नाही. त्याच बरोबर जर का त्या फोटोमध्ये कोणता प्राणी असेल.

किंवा स्वामी समर्थ महाराज कोणत्या प्राण्या बरोबर बसलेली असतील. तर तो फोटो सुद्धा तुम्हाला घ्यायचा नाही. अगदी साधा सरळ फोटो ज्यामध्ये स्वामी बसलेले आहेत. फक्त असाच फोटो विकत घ्यावा. मित्रांनो स्वामींचा फोटो आपल्याकडे आधीपासून असेल. तर तो कोणत्या दिशेला लावावा याबद्दल आपल्या मनात शंका येतात.

आणि स्वामी भक्त हो तुम्ही स्वामीचा फोटो कोणत्याही रूम मध्ये लावा काही हरकत नाही, पण तो फोटो पूर्व किंवा पश्चिम दिशेला लावावा. मित्रांनो तुम्ही एका पाटावर सुद्धा, शुभ्र धुतलेल वस्त्र मांडून त्यावर फोटो ठेवू शकता. परंतु मित्रांनो एक गोष्ट म्हणजे आपल्या घरामध्ये जर स्वामींची मूर्ती किंवा स्वामींचा फोटो असेल तर तो आपण आपल्या घरामध्ये आपल्याला ज्या ठिकाणी शक्य होईल त्या ठिकाणी स्थापन करायचं आहे परंतु मित्रांनो आजच्या आपण गोष्टीबद्दल जाणून घेणार आहोत ही गोष्ट म्हणजे आपल्या घरामध्ये जर स्वामींचा फोटो असेल किंवा स्वामींची मूर्ती असेल तर मित्रांनो अशावेळी आपण एक गोष्ट न चुकता केली पाहिजे ती म्हणजे स्वामींची सेवा.

मित्रांनो आपल्या जीवनामध्ये जे काही दुःख आहे किंवा ज्या काही अडचणी आपल्या जीवनामध्ये आहे त्या सर्व दूर करण्यासाठी स्वामी आपल्या पाठीशी कायम उभे असतातच फक्त आपण दररोज स्वामींची सेवा करून स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा आणि मित्रांनो यावेळी आपण स्वामींचे नित्यसेवा करतो किंवा स्वामींची तर कोणती सेवा करतो तर यामुळे स्वामी आपल्यावर कायमच प्रसन्न राहतात.

म्हणून मित्रांनो आज आपण गोष्ट जाणून घेणार आहोत हीच आहे की आपल्याला आपल्या घरामध्ये असणारे स्वामींचे फोटो समोर किंवा मूर्ती समोर बसून स्वामींची कोणती ना कोणती तरी एक छोटीशी सेवा तरी नक्की करायची आहे मित्रांनो यामुळे साक्षात स्वामी आपल्या सोबत राहतील आणि आपल्या वर येणाऱ्या प्रत्येक संकटांपासून आपले रक्षण करतील तर मित्रांनो अशी ही एक गोष्ट तुम्ही आजपासूनच तुमच्या दिनचर्यामध्ये करायला सुरुवात करा.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment