चहा किंवा काही खाल्ल्यानंतर छातीत किंवा घशाजवळ खूप जळजळ होतेय? करा ‘हे’ घरगुती उपाय!

अनेकांना छातीत जळजळ होण्याचा त्रास होतो. खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, जास्त तेलकट ाणि मसालेदार पदार्थ खाणे अशा लोकांना छातीत जळजळ होण्याचा त्रास होतो. अशावेळी गॅस, बद्धकोष्ठता, अपचन, पोटदुखी, उलट्या आणि अॅसिडिटीचा सर्वाधिक सामना करावा लागतो. यासाठी काही लोक स्वत:हून काही प्रकारची औषधे घेतात. मात्र यानंतरही आराम मिळत नाही, अशावेळी तुम्ही काही घरगुती उपाय करुन छातीत होणाऱ्या जळजळीपासून आराम मिळवू शकता.

पोटातील आम्ल वारंवार घशापर्यंत वाढते तेव्हा या समस्येला गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्स रोग म्हणतात. त्यामुळे छातीत जळजळ, आंबट ढेकर येणे, अन्ननलिकेत अॅसिड चढणे, छातीत दुखणे, घशात काहीतरी अडकल्याची भावना, घशात सूज येणे, खोकला ही लक्षणे दिसू शकतात.

काही लोकांना खाल्ल्यानंतर लगेच जळजळ आणि ढेकर येत नाही, परंतु ही समस्या काहीवेळाने इतकी वाढते की, चहा किंवा पाणी प्यायल्यानंतरही अॅसिड होऊ लागते. तुम्हालाही अशाच समस्येचा सामना करावा लागत असेल, तर तुम्ही पोषणतज्ञ किरण कुकरेजा यांचे 3 घरगुती उपाय फॉलो करुन पाहा.

दुपारच्या जेवल्यानंतर तुम्ही केळी खाऊ शकता . त्यात पोटॅशियम असते, ज्यामध्ये अल्कधर्मी गुणधर्म असतात जे अन्न अतिरिक्त ऍसिडचे प्रमाण कमी करण्यास मदत करते.

१ चमचा सब्जाच्या बिया १ ग्लास पाण्यात १० मिनिटे भिजत ठेवा. या बिया थंड असतात, त्यामुळे पोटालाही थंडावा मिळतो. त्यामुळे पोटाची आग आणि जळजळ कमी होते.

जेवणानंतर १० ते १५ मिनिटांनी बडीशेप आणि गूळ खाणे आवश्यक आहे. बडीशेपमुळे अँटासिडी कमी करण्याचे काम करते आणि पचनशक्ती वाढवते. गॅस, पोट फुगणे, आंबट ढेकरही याने दूर होऊ शकतात.

Leave a Comment