मित्रांनो घरामध्ये सुख-समृद्धी रहावी आणि त्याचबरोबर मनामध्ये असलेली इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हावी यासाठी आपल्यातील बऱ्याच जणांना अनेकांकडून स्वामी समर्थांच्या गुरुचरित्र पारायण मधील चौदावा अध्याय वाचण्याचा सल्ला दिला जातो. मित्रांनो आपल्यातील काही स्वामी सेवेकरी अगदी मनापासून स्वामी समर्थांची सेवा करतात. त्या सेवेमध्ये स्वामींच्या गुरुचरित्र पारायण यामधील 14 व्या अध्यायाचे वाचन करतात. कारण मित्रांनो 14 व्या अध्यायाचे वाचन जर आपण केले तर यामुळे आपल्या घरांमध्ये सुख-समृद्धी नांदते आणि त्याचबरोबर आपल्या मनामध्ये असणाऱ्या सर्व इच्छाही पूर्ण होतात.
गुरुचरित्र 14 वा अध्याय कसा वाचावा? कोणते नियम पाळावे? याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया.तर मित्रांनो,
ही सेवा आपल्याला गुरूवारच्या दिवशी करायचे आहे. मित्रांनो ही सेवा करत असताना सर्वात आधी आपल्याला या सेवेची वेळ निश्चित करून घ्यायचे आहे. तुम्ही सेवा जर सकाळच्या वेळी करणार असाल तर सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून आपल्या देवघरामध्ये रोजची देवपूजा करून झाल्यानंतर ही सेवा करू शकता.
संध्याकाळी करणार असाल तर संध्याकाळच्या वेळी स्वच्छ हातपाय धुऊन देवघरामध्ये अगरबत्ती आणि दिवा लावल्यानंतर तुम्हाला ही सेवा करायची आहे. या सेवेमध्ये आपल्याला प्रामुख्याने तीन गोष्टी करायच्या आहेत.
सर्वात पहिली गोष्ट आपल्याला करायचे आहे ती म्हणजे स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर किंवा मूर्तीसमोर बसून आपल्या बाजूला एक ग्लासमध्ये पाणी ठेवायचा आहे आणि त्याचबरोबर एक किंवा दोन अगरबत्ती हीच आपल्या बाजूला लावायचे आहेत.
त्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप एक माळ पूर्ण होईपर्यंत म्हणजे 108 वेळा करायचा आहे आणि त्यानंतर गुरुचरित्र मधील चौदावा अध्यायाचे वाचन तुम्हाला एक वेळा करायचे आहे मित्रांनो सर्वात आधी स्वामी समर्थांच्या मंत्र आणि त्यानंतर गुरुचरित्र या मधील 14 व्या अध्यायाचे वाचन तुम्हाला स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर बसून करायचे आहे.
मित्रांनो स्वामी समर्थांच्या केंद्रांमध्ये तुम्हाला गुरुचरित्राचे पुस्तक मिळून जाईल आणि जर तुम्हाला कितीही मिळाले नाही तर अशा वेळी मित्रांनो तुम्ही पूजेच्या साहित्याच्या दुकानातून किंवा तुमच्या घरा जवळ असणाऱ्या स्वामी समर्थांच्या किंवा गुरूदत्तांच्या मंदिराजवळ तुम्हाला हे पुस्तक सहज उपलब्ध होईल. तिथून हे पुस्तक घरी आणून मगच तुम्हाला स्वामींची ही सेवा सुरू करायची आहे.
या गोष्टी आपण केल्या म्हणजेच ही पूर्ण सेवा आपण अगदी मनापासून आणि श्रद्धेने केली तर यामुळे स्वामी समर्थ आपल्यावर प्रसन्न होतीलच आणि त्याचबरोबर आपल्या मनातील ही सर्व इच्छा या सेवेमुळे पूर्ण होतील.
वरील माहिती विविध स्त्रोतांची आधारे एकत्रित करण्यात आली आहे. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.