संतानप्राप्ती हवी असल्यास आवर्जुन करा ‘हे’ व्रत!

मित्रांनो, येत्या २९ जुलै २०२३ रोजी श्रीविष्णूंचं आवडतं व्रत म्हणजेच पद्मिनी एकादशीचं व्रत पाळलं जाणार आहे. पद्मिनी एकादशीचं व्रत खासकरून ज्या जोडप्यांना संतानप्राप्ती होत नाही अशा जोडप्यांसाठी वरदान सांगितलं गेलं आहे.

पद्मिनी एकादशी दर तीन वर्षातून एकदा येते त्यामुळे या एकादशीचं महत्व अनन्यसाधारण आहे. ही एकादशी अधिक मासात येते. यंदा मात्र अधिकमास हा श्रावणात आल्याने या एकादशीचं महत्व वाढलं आहे.

भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिराला पद्मिनी एकादशी व्रताचे महत्त्व सांगितले आणि त्याची कथा सांगितली. त्रेतायुगात महिष्मती नावाची नगरी होती. या नगरीत कृतवीर्य नावाचा राजा होता. त्याला खूप बायका होत्या, पण तरीही त्याला मुलगा नव्हता. राजाला नेहमी पुत्र व्हावा असं वाटत असे आणि तो दु:खी होत असे. पुत्रप्राप्तीसाठी राजाने अनेक उपाय केले, पण त्यांची इच्छा पूर्ण झाली नाही.

तेव्हा राजाने वनात जाऊन तपश्चर्या करण्याचे ठरवले. त्याच्यासोबत त्याची एक राणी पद्मिनीही जंगलात येण्यासाठी तयार झाली. दोघेही राजवाडा सोडून, नगर सोडून गंधमादन पर्वतावर गेले. राजाने कित्येक वर्षे कठोर तपश्चर्या केली, परंतु त्यांना काही पुत्रप्राप्ती झाली नाही.

एके दिवशी अनुसूयाने राणी पद्मिनीला सांगितले की अधिकमास दर तीन वर्षांनी एकदा येतो. या अधिक मासात शुक्ल पक्षात पद्मिनी एकादशीचे व्रत केल्यास सर्व मनोकामना लवकर पूर्ण होतात. भगवान श्री हरी विष्णू प्रसन्न होऊन तुला पुत्राचे वरदान देतील.

अधिक मास आल्यावर राणीने पुत्रप्राप्तीच्या इच्छेने पद्मिनी एकादशीचे व्रत ठेवले. उपवास आणि पूजा केली. दिवसा उपाशी राहून रात्री जागरण केलं. या व्रताने प्रसन्न होऊन श्रीहरी विष्णूंनी राणीला पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद दिला.

राणी गरोदर राहिली आणि ०९ महिन्यांनी तिला कार्तवीर्य नावाचा मुलगा झाला. तो खूप बलवान आणि पराक्रमी होता. त्याच्या पराक्रम तिन्ही लोकांमध्ये तेजाने फडकत होता.

भगवान श्रीकृष्णांनी युधिष्ठिराला सांगितले की, जो व्यक्ती पद्मिनी एकादशी व्रत कथा ऐकतो, त्याची कीर्ती वाढते आणि मृत्यूनंतर त्याला श्रीहरीच्या चरणी स्थान मिळते.

Leave a Comment