मित्रांनो, भारत सांस्कृतिक आणि सामाजिक वैविध्यांनी नटलेला देश आहे. त्यामुळे प्रत्येक प्रदेशानुसार लोकांच्या खाण्या-पिण्यातही वैविध्य आढळून येत. आता यामध्ये काही लोक वरण किंवा आमटी-चपाती, भाजी-चपाती खाणं पसंत करतात. तर काही लोकांना दुधामध्ये चपाती कुस्करुन खायची सवय असते. महाराष्ट्रातही बहुतांश घरात दुधासोबत चपाती, पुरणपोळी खातात. तसेच बहुतांश भारतीय लोकही घरी रात्रीच्या जेवणात दुधासोबत चपाती खातात. याचं कारण दुधात अनेक पोषक तत्व असतात.
त्यामुळे आपल्याकडे चांगलं आरोग्य राखण्यासाठी दररोज दूध प्यायला सांगितलं जातं. पण खरंच दुधासोबत चपाती खाल्यामुळे जास्त फायदा मिळतो का? याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.
रात्री जेवण केल्यानंतर एक तासाने दूध प्यायला हवं. यामुळे अनेक फायदे मिळू शकतात. दुधामध्ये अनेक पोषणतत्व असतात. तसेच दुधात कॅसिन आणि कॅल्शियमसारखी असतं. पण यातील कॅसिन पचनास जड असते. याशिवाय दुधात ट्रिप्टोफॅन असते.
जे सेरोटोनिन तयार करणारे अॅमिनो अॅसिड आहे. यामुळे चांगली झोप येण्यास मदत मिळू शकते. त्यामुळे दररोज चांगली झोप हवी असेल तर दुधाचं सेवन करायला हवं. या कारणामुळे रात्री झोपण्याआधी दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे तुमचं आरोग्यही चांगलं राहतं.
परंतु पोट भरावं तसंच पोषणतत्त्व मिळावेत या उद्देशाने तुम्ही दुधासोबत चपाती खात असाल, तर याला काहीच अर्थ नाही. यांचं कारण दूध आणि चपाती एकत्र करुन खाल्लं तर तेवढाच फायदा मिळतो जेवढा दूध आणि चपाती यांना वेगळं करुन सेवन केल्यावर मिळतो. परंतु मधुमेही रुग्णांनी गव्हाच्या चपात्या खायचं टाळायला हवं.
याचं कारण गव्हाची चपाती-दूध एकत्र खाल्यामुळे शरीराला अतिरिक्त कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स मिळतात. यामुळे तुमचं वजन वाढण्याची शक्यता असते. यामुळे तुम्हाला अनेक शारीरिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे मधुमेही रुग्णांनी गव्हाच्या चपात्यांऐवजी बाजरी, ज्वारीच्या भाकरी खायला हवी. यामुळे शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित राहते आणि अनेक आरोग्यदायी फायदेही मिळतात.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.