कुंडलीतील शनिदोषामुळे कामात अडचणी येतात तर मग शनिवारी करा हा उपाय, अनेक अडथळे होतील दूर!

हिंदू धर्मात प्रत्येक ग्रहाचे त्याच्या राशीनुसार फळ प्रत्येकाला मिळत असते. कुंडलीत असणाऱ्या प्रत्येक ग्रहाला त्याच्या विशिष्ट परिक्रमा पार करुन त्याचे फळ द्यावे लागते.ग्रहमानानुसार सगळ्यात कडक ग्रह शनि ज्याचा अनेकांवर चांगला वाईट परिणाम होत असतो.

शनिदेवाला न्याय देवता आणि कर्माचा दाता म्हटले जाते. तो मनुष्याला त्याच्या कर्माप्रमाणे फळ देतो. त्याचा राग अत्यंत हानिकारक मानला जातो. अशा परिस्थितीत प्रत्येकाला त्याचा रागाला बळी पडायचे नसेल तर त्यासाठी अनेक उपाययोजनाही केल्या जातात.

ज्योतिषशास्त्रानुसार ज्यांच्या कुंडलीत शनि दोष असतो त्यांना आयुष्यात अधिक त्रास सहन करावा लागतो. परंतु, त्यातही असे काही उपाय आहे ज्यामुळे या दोषापासून आपली सुटका होऊ शकते. जाणून घेऊया त्याबद्दल

ज्योतिषांच्या मते कुंडलीतून शनि दोष दूर करण्यासाठी व्यक्तीने शनिवारी व्रत ठेवावे. असे केल्याने जीवनातील सर्व प्रकारचे संकट दूर होतात आणि मार्गात येणारे अडथळे दूर होतात. हे व्रत पाळण्यासाठी सकाळी लवकर उठून स्नान करावे. यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून पिंपळाच्या झाडाच्या मुळास जल अर्पण करावे. यानंतर लोखंडापासून बनवलेल्या शनिदेवाच्या मूर्तीला पंचामृताने स्नान घालावे. यानंतर शनिदेवाची पूजा करून शनि चालीसा वाचावी.

धार्मिक विद्वानांच्या मते, जेव्हा तुम्ही शनिवारचे व्रत पाळत असाल तेव्हा त्या दिवशी लसूण, कांद्यासोबत कोणतेही तामसिक किंवा मांसाहार करू नये. यासोबतच इतरांबद्दल तुमच्या मनात कोणत्याही चुकीच्या गोष्टची विचार करू नका किंवा बोलू नका. शनिवारी गरजूंना योग्य ते दान करा आणि मुंग्यांना पीठ खाऊ घाला.

जर महिलांनी शनिवारी उपवास केला असेल तर त्यांनी चुकूनही शनिदेवाच्या मूर्तीला हात लावू नये, त्यांच्या पायांकडे पाहिले पाहिजे. असे न केल्यास घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. तसेच महिलांनी कोणत्याही परिस्थितीत शनिदेवाच्या मूर्तीवर मोहरीचे तेल अर्पण करू नये हे लक्षात ठेवा. हे करणे स्त्रियांसाठी निषिद्ध मानले जाते आणि हे काम फक्त पुरुषच करू शकतात.

ज्योतिषांच्या मते, ज्या लोकांना त्यांच्या चालू कामात अडथळे येत आहेत, त्यांना शनिवारी व्रत पाळल्याने खूप फायदा होतो. हे व्रत केल्याने घरात सुख-शांती नांदते. नोकरी-विवाहात येणारे अडथळे दूर होतील. घरातील कलह संपतो. कुटुंबात पैशाचा ओघ वाढतो. कुंडलीत शनि दोष नाहीसा झाल्यामुळे रोगांपासून आराम मिळतो.

Leave a Comment