Friday, September 22, 2023
Homeअध्यात्मरोज सकाळी उठल्यावर स्वामींना ही प्रार्थना करा; कोणतीच अडचण येणार नाही, दिवस...

रोज सकाळी उठल्यावर स्वामींना ही प्रार्थना करा; कोणतीच अडचण येणार नाही, दिवस चांगला जाईल!

Lमित्रांनो प्रत्येकाच्याच घरी देवघर हे असतेच आणि दररोज घरातील व्यक्ती या देवपूजा करीत असतात. आपल्या देवघरांमध्ये विविध देवी-देवतांच्या मुर्त्या या पाहायला मिळतातच आणि दररोज सकाळी उठल्यानंतर स्नान झाल्यानंतर सर्वजण अगदी देवांचे दर्शन, प्रार्थना हे करतच असतात. तर मित्रांनो आज मी तुम्हाला रोज सकाळी तुम्ही उठल्यानंतर स्वामींना ही प्रार्थना केली तर यामुळे तुम्हाला कोणतीच अडचण येणार नाही. तुमचा दिवस चांगला जाईल आणि ही प्रार्थना नेमकी कोणती आहे सांगणार आहे.

तर प्रत्येक जण आपल्या जीवनामध्ये अडचणी येऊ नये किंवा आपल्याला दररोजचा दिवस हा आनंदाने जावा, सुखाचा जावा, कामांमध्ये अडचण येऊ नये असे मनोमन प्रत्येकाला वाटत असेल त्यासाठी मग दररोज देवांचे नामस्मरण, पूजाविधी हे करत असतात. परंतु ही एक प्रार्थना तुम्ही जर रोज सकाळी उठल्यावर स्वामींना केली तर तुमचा दिवस नक्कीच आनंदात जाईल.

जी काही तुमची दिवसभराची कामे असतील ती नक्कीच पूर्ण होतील. तर ती प्रार्थना कोणती आहे चला तर जाणून घेऊयात. सकाळी उठल्यानंतर स्नान करून झाल्यानंतर देवपूजा आहे ती देवपूजा करून घ्यायची आहे. स्वामींच्या मूर्ती समोर हात जोडून तुम्हाला बसायचे आहे आणि स्वामींना ही प्रार्थना करायची आहे.

हे स्वामी महाराज मी उठल्यावर तुमचे दर्शन घेत आहे त्यामुळे माझा दिवस खूपच चांगला जाऊ दे. तसेच जे काही आज मी काम करणार आहे यामध्ये मला यशही मिळू दे म्हणजेच माझ्या कुटुंबीयांवर आणि माझ्यावर तुमची कृपाछत्र कायम असू द्या. कोणतेही विघ्न माझ्या कामांमध्ये येऊ देऊ नका अशी प्रार्थना तुम्ही स्वामी महाराजांना करायचे आहे आणि नमस्कार करायचा आहे.

अशी ही प्रार्थना तुम्ही जर दररोज केला तर यामुळे स्वामी महाराज नक्कीच तुमच्या पाठीशी उभे राहतील. प्रत्येक अडचणीतून तुम्हाला बाहेर काढतील आणि प्रत्येक दिवस हा तुमचा आनंदाचा जाईल.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

RELATED ARTICLES

महाराष्ट्र

राजकीय घडामोडी

क्राइम

मनोरंजन