मित्रांनो प्रत्येकालाच आपला मुलगा किंवा मुलगी यांची प्रगती व्हावी ते खूपच मोठे व्हावेत आणि त्यांना यश सहजासहजी मिळून जावे तसेच प्रत्येक कामांमध्ये त्यांना यश मिळत राहावे म्हणजेच कोणत्याही अडचणी, संकटे येऊ नयेत ते अगदी उंच शिखरावर पोहचावेत तसे वाटत असते. म्हणजे त्यांना कशाचीही कमतरता भासू नये त्यांचे जीवन सुखी समाधानाचे असावे समृद्धीचे असावे असे वाटतच असते.
परंतु आपल्या घरातील जी मुले आहेत ही काही केल्याने जर अभ्यास करत नसतील, खूपच त्रास देत असतील त्यावेळेस मात्र आपल्याला खूपच त्यांची काळजी वाटायला लागते. घरातील सदस्य काही सांगून देखील त्यांच्यावर जर काहीच फरक पडत नसेल म्हणजेच ते अभ्यासाला बसत नसतील हट्टीपणा यांचा जास्त वाढला असेल, खूपच त्रास देत असतील तर आज मी तुम्हाला यावर स्वामिनी सांगितलेला एक प्रभावी उपाय सांगणार आहे.
हा जर उपाय तुम्ही केला तर यामुळे तुमच्या मुलांचे अभ्यासात नक्कीच लक्ष लागेल. त्यांना अभ्यासामध्ये एक प्रकारचा गोडवा निर्माण होईल. तसेच त्यांना मार्क देखील चांगले मिळतील आणि ते यश देखील संपादन करतील. हा उपाय घरातील कोणत्याही व्यक्तीने केला तरी चालतो म्हणजे स्त्री असो पुरुष असो यांनी आपल्या मुलांसाठी हा उपाय आवश्य करायचा आहे.
मित्रांनो आपल्या घरामध्ये मुले जर कोणत्याही कारणाने चिडचिड करत असतील तसेच वडीलधाऱ्या लोकांचा अपमान करत असतील, त्यांना काहीही उलट सुलट बोलत असतील, अभ्यास काही केल्याने करत नसतील तर हा त्यावरती खूपच प्रभावी असा उपाय असणार आहे. तर या उपायांमध्ये तुम्हाला सरस्वती मंत्राचा जप करायचा आहे.
मित्रांनो सरस्वती देवी ही विद्येची देवी मानली गेलेली आहे आणि जर सरस्वती मंत्राचा जप केला तर मुलांना अभ्यासामध्ये गोडवा लगेच निर्माण होतो. तर हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे आता आपण जाणून घेऊयात. तर घरातील कोणतेही स्त्री-पुरुष यांनी हा उपाय आपल्या मुलांसाठी करायचा आहे. तर हा उपाय करत असताना पहिल्यांदा तुम्हाला हात पाय स्वच्छ धुवून आपल्या देवघरासमोर बसायचे आहे आणि एका ग्लासमध्ये आपल्याला शुद्ध पिण्याचे पाणी घ्यायचे आहे आणि तो ग्लास आपल्याला देवघरांमध्ये ठेवायचा आहे.
नंतर तुम्हाला सरस्वती मातेचा मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र काहीसा असा आहे
ओम सरस्वती नमः
तर या मंत्राचा जप तुम्हाला एक माळ करायचा आहे. अगदी मनोभावे श्रद्धेने या मंत्राचा जप एक माळ करायचा आहे आणि स्वामीना प्रार्थना करायची आहे विद्येची देवता सरस्वतीला प्रार्थना करायची आहे की, माझ्या मुलांचे अभ्यासात लक्ष लागू दे. त्यांना कामांमध्ये यश प्राप्त होऊ दे. कोणत्याही अडचणी त्याला येऊ नये. अशी प्रार्थना करून झाल्यानंतर जे आपण देवघरांमध्ये एक ग्लास पाणी ठेवलेले आहे हे पाणी आपण आपल्या मुलांना प्यायला द्यायचे आहे.
मित्रांनो हा उपाय तुम्ही दररोज करायचा आहे. हा उपाय केल्याने काही दिवसातच तुम्हाला जाणवू लागेल की, आपली मुले अभ्यास करत आहेत. त्यांना अभ्यासाची गोडी लागलेली आहे. तर अशा प्रकारे सरस्वती मातेचा तुम्ही मंत्र जप केला तरी यामुळे नक्कीच तुमची मुले चिडचिड करत होती ती सर्व चिडचिड कमी होईल. अभ्यासामध्ये त्यांचे लक्ष लागेल.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.