श्रावणामध्ये उपवास करण्याचे काय आहेत फायदे?

मित्रांनो यंदाच्या वर्षी १८ जुलैपासून श्रावण मास सुरू होत असून अधिक महिन्यामुळे श्रावणमास ५९ दिवसांचा असणार आहे. हिंदू धर्मात श्रावण महिना अत्यंत पवित्र मानला जातो.

हिंदू धर्मात श्रावण महिना अत्यंत पवित्र मानला जातो. हा महिना भगवान शंकराला समर्पित असून संपूर्ण श्रावणमासामध्ये महादेवाची पूजा आणि व्रतवैकल्य केली जातात. श्रावणामध्ये श्रावणी सोमवाराचे व्रत केले जातात. यावेळी दिवसभर केवळ फलाहार केला जातो आणि रात्री जेवण करून उपवास सोडला जातो.

तसंच श्रावणामध्ये अनेक भागांमध्ये मांसाहार देखील केला जात नाही. खरं तर यामागे धार्मिक कारणं असली तरी या उपवासांमागे काही वैज्ञानिक कारणं देखील लपलेली आहे.

श्रावणातील उपवासांचा शारीरक आणि अनेक मानसिक फायदे असतात. श्रावणामध्ये उपवास ठेवण्याच्या प्रथेमागे असलेल्या वैज्ञानिक कारणांचं महत्व आयुर्वेदातही सांगण्यात आलं आहे. पावसाळ्याच्या या काळामध्ये ठेवलेल्या या उपवासांमुळे तसंच सकस आहारामुळे आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते.

आयुर्वेदामध्ये श्रावणातील उपवासांमागील काही तर्क मांडण्यात आले आहेत. पावसाळ्याच्या काळामध्ये खराब वातावरण आणि पावसामुळे भाज्यांचं उत्पादन कमी होतं. तसंच अनेक पालेभाज्यांवर किड-रोगाचा प्रादूर्भाव वाढतो. या भाज्यांच्या सेवनामुळे पोटाचे विकार होण्याची शक्यता असते.

पावसाळ्यामध्ये पचनशक्ती मंदावते तसंच या काळात आतड्यांचं आरोग्य बिघडण्याची शक्यता वाढते. यामुळे पोटाच्या आणि आतड्यांचे काही आजार होण्याचा धोका जास्त असतो. या काळामध्ये अपचन, गॅस, अॅसिडिटी, पोट फुगण्याच्या समस्या जाणवतात.

या काळामध्ये आठवड्यातून एकदा उपवास धरल्यास पोटाला आराम मिळतो. तसंच पोटाची निगडित आजारांचा धोका टळतो. यामुळे ब्लोटिंगस अॅसिडिटी सारख्या समस्या दूर होतात. तसंच उपवासामुळे शरीरातील फॅट्सचं एनर्जीमध्ये रुपांतर होतं आणि फॅट्स कमी होण्यास मदत होते.

म्हणूनच श्रावणामासात श्रावणी सोमवारच्या एका दिवसाच्या उपवासाच्या निमित्ताने शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते आणि आरोग्य चांगलं राहतं.

Leave a Comment