अंघोळ करताना करा या मंत्राचा जाप, मिळेल पवित्र नदीत स्नान करण्याचे पुण्य!

धर्मग्रंथात पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याचा महिमा सांगितला आहे. पवित्र नदीत स्नान केल्याने माणसाची सर्व पापे नष्ट होतात अशी धार्मिक मान्यता आहे. स्नान करताना मंत्रांचा जप करणे देखील खूप महत्वाचे आहे. घरात स्नान करतानाही या मंत्रांचा जप केल्यास पवित्र नदीत स्नान करण्याचे पुण्य मिळते. चला जाणून घेऊया ते कोणते मंत्र आहेत ज्याचा जप स्नान करताना केल्याने फायदा होतो.

हिंदू धर्मात प्रत्येक कामाचे पावित्र्य जपले जावे म्हणून मंत्रांशी जोडले गेले आहे. स्नानाच्या वेळी मंत्र पठण केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होते असे शास्त्रात सांगितले आहे. त्याच वेळी, मनुष्याचे शरीर आणि आत्मा शुद्ध राहतात. एवढेच, या मंत्राचा जप केल्याने निरोगी आयुष्य मिळते. तसेच नकारात्मक ऊर्जा तुमच्यापासून दूर राहते. मान्यतेनुसार, आंघोळ करताना या मंत्राचा जप केल्याने राहूचा अशुभ प्रभाव कमी होतो.

आंघोळ करताना या मंत्राचा जप करा. तो मंत्र काहीसा असा आहे,
गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वति। नर्मदे सिन्धु कावेरी जलऽस्मिन्सन्निधिं कुरु।।

या मंत्राचा अर्थ असा होतो की
‘हे गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधू, कावेरी नद्यांनो, तुम्ही सर्व माझ्या या पाण्यात स्नानाला या’ असा या मंत्राचा अर्थ आहे.

हिंदू धर्मात सूर्योदयापूर्वी स्नान करण्याचा नियम आहे, त्यामुळे ब्रह्म मुहूर्तावर स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते. तीज सणाच्या दिवशी स्नानाच्या पाण्यात थोडे गंगाजल टाकून स्नान करावे. हिंदू मान्यतेनुसार चुकूनही अन्न खाल्ल्यानंतर लगेच आंघोळ करू नये. आंघोळ करण्याआधी स्नानगृह स्वच्छ करावे. आंघोळीच्या पाण्यात तुळस आणि कडूलिंबाचे पाने टाकावे.

Leave a Comment