मित्रांनो, प्रत्येक जण हा कोणत्या ना कोणत्या देवी-देवतांचा भक्त असतोच. ते अगदी त्या त्या देवी देवतांची पूजा अर्चना अगदी भक्ती भावाने करीत असतात. आपल्या देवांवर भक्तांचा विश्वास देखील असतो. तसेच प्रत्येक संकटातून ते आपल्याला बाहेर काढतील असा त्यांचा आपल्या देवांवर विश्वास असतोच. मित्रांनो सोमवार हा महादेवांचा वार मानला जातो. या दिवशी बरेच भक्त सोमवार हे व्रत करीत असतात.
तसेच भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन त्यांची विधीवत पूजा देखील करीत असतात. अनेक संकटे अडचणी यातून बाहेर काढण्यासाठी ते प्रार्थना देखील करीत असतात. तर मित्रांनो त्यांच्या पूजेसाठी आपणाला एक तांब्या पाणी आणि काही बेलपत्राची पाने पुरेशी असतात. शिवलिंगावर जल आणि बेलपत्र अर्पण करणाऱ्या भक्तांच्या सर्व मनोकामना भोलेनाथ पूर्ण करीत असतात.
जर एखाद्या व्यक्तीने श्रावण आणि महाशिवरात्रीला पूजा केली तर भगवान शिव त्याला इच्छित जीवनसाथी, संतती, सुख आणि सौभाग्य यांचा आशीर्वाद देतात. वर्षातील हे दोन प्रसंग शिवभक्तांसाठी खास आहेत. यावर्षी 18 फेब्रुवारी 2023 रोजी देशभरात महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या थाटात साजरा केला जाणार आहे.
मित्रांनो भगवान शंकरांच्या पूजेमध्ये बेलपत्राचे विशेष असे महत्त्व आहे. बेलपत्र शिवशंकरांना अतिशय प्रिय आहे. त्यामुळे तुम्ही शिवरात्रीच्या पूजेमध्ये बेलपत्र अवश्य घ्यायची आहेत. तर शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करीत असताना हे बेलपत्र नेमके किती आपणाला अर्पण करायची आहेत याची माहिती बऱ्याचशा लोकांना नसते. त्यामुळे ते आपल्या मनाने कितीही बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करत असतात.
तर मित्रांनो शिवलिंगावर बेलपत्र आपण किती अर्पण करायची आहेत याविषयीची आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर शिवलिंगावर 3 ते 11 बेलपत्रे अर्पण करणे शुभ मानले जाते. परंतु तुम्ही यापेक्षा जास्त देखील बेलपत्र अर्पण करू शकता. यामुळे शिवशंकर आपल्यवर प्रसन्न होऊ शकतात. तसेच लवकर लग्नासाठी शिवलिंगावर 108 बेलपत्र अर्पण करावेत.
शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करताना पानाचा गुळगुळीत भाग हा शिवलिंगावर राहिला पाहिजे. शिवलिंगावर नेहमी गुळगुळीत बेलपत्र अर्पण करावे. जर तुमच्याकडे जास्त बेलपत्रे नसतील तर तुम्ही आहे तीच बेलपत्रे पाण्याने धुवून पुन्हा पुन्हा अर्पण करू शकता. शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करीत असताना ते बेलपत्र कोठूनही फाटलेले नसावे. तसेच त्यावर अनेक पट्टे नसावेत. ज्या बेलपत्रावर पट्टे आहेत ते पूजेत वापरू नयेत.
तर मित्रांनो वरील सांगितल्याप्रमाणे तुम्ही शिवलिंगावर योग्य तेवढीच बेलपत्रे अर्पण करायची आहेत.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.