मित्रांनो, बरेच जण हे मनामध्ये अनेक पूजा विधी, व्रत करायचे असे ठरवितात. परंतु वेळेअभावी त्यांना काहीच जमत नाही. प्रत्येकाला स्वामींची सेवा करावी असे वाटतच असते. परंतु वेळेअभावी आपल्या कामाच्या गडबडीमध्ये आपणाला वेळ भेटत नाही. त्यामुळे आपल्याला स्वामींची सेवा करणे जमत नाही. तर अशा वेळेस आपल्या मनी खूपच निराशा होते. तर मित्रांनो जर तुम्हाला कामाच्या वेळेमध्ये सेवा करणे जमत नसेल म्हणजेच स्त्रियांना कुटुंबातील भरपूर कामे असतात आणि या कुटुंबांच्या देखभालीमध्ये यांना स्वामींची सेवा करणे जमत नाही.
पुरुषांना नोकरीला असल्यामुळे देखील स्वामींची सेवा करणे जमत नाही तर अशा वेळेस मी तुम्हाला एक काम सांगणार आहे. म्हणजे जर तुम्हाला सेवा जमत नाही तर हे एक काम तुम्ही करायचे आहे. यासाठी फक्त तुम्ही पाच मिनिटे वेळ काढायचा आहे. तर मित्रांनो यामुळे स्वामींची कृपा नक्कीच होईल. स्वामी तुमच्या पाठीशी उभे राहतील.
तर संध्याकाळी जेवण झाल्यानंतर म्हणजे झोपण्याच्या अगोदर तुम्हाला फक्त पाच मिनिटे काढायचे आहेत आणि तुम्हाला देवघरासमोर बसायचे आहे. दिवा अगरबत्ती लावायची आहे आणि फक्त श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप पाच मिनिटे करायचा आहे. अगदी मनोभावे तुम्ही कोणताही विचार न घेता या मंत्राचा जप करत राहा. यामुळे स्वामी कृपा तुमच्यावर नक्कीच होईल.
म्हणजेच तुम्हाला तुमच्या वेळेअभावी स्वामींची सेवा करणे जमत नाही तर हे पाच मिनिटे काढून तुम्ही स्वामींची सेवा आवश्यक करा. यामुळे स्वामी नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होतील.