अशी करा सोमवती अमावस्येची पूजा, मिळेल माता पार्वतीचाही आशीर्वाद!

अमावस्येला पूजा केल्यानंतर धनाची देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. सोमवती अमावस्येला पूजा करणे हे खूप फलदायी मानली जाते. शिवाला समर्पित असलेल्या श्रावण महिन्यात अमावस्या तिथीचे महत्त्व अधिक आहे. सोमवती अमावस्येच्या दिवशी उपवास केल्याने विवाहित महिलांना अखंड सौभाग्य प्राप्त होते. श्रावण महिन्यात येणाऱ्या सोमवती अमावस्येची पूजा कशी करायची तसेच शुभ मुहूर्त, पूजा पद्धती आणि नियम हे आपण जाणून घेऊ.

पंचांगानुसार श्रावण महिन्यातील अमावस्या या वर्षी 17 जुलै रोजी सुरू होते आहे. अमावस्या तिथी 16 जुलै रोजी रात्री 10:08 पासून सुरू होते आहे तर 18 जुलै रोजी मध्यरात्री 00:01 पर्यंत राहणार आहे. या काळात पूजा, जप आणि तपश्चर्या करणे हे अत्यंत फलदायी मानली जाते. यंदा श्रावण अमावस्या तिथी सोमवारी येत असल्याने तिचे महत्त्व अधिक आहे.

या दिवशी स्नान करून दान करणे तसेच जप आणि तपश्चर्या यांना अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. श्रावण महिन्यातील अमावास्येला गंगेच्या तीरावर किंवा इतर कोणत्याही जल यात्रेत स्नान करावे. हे शक्य नसल्यास स्नानाच्या पाण्यात गंगेचे पाणी मिसळून स्नान करावे. आपल्या क्षमतेनुसार दान करावे.

सोमवती अमावस्येच्या दिवशी पितरांसाठी तर्पण केले किंवा त्यांच्यासाठी पिंडदान केले, तर त्यांचे विशेष आशीर्वाद प्राप्त होतात, असी हिंदू मान्यता आहे. सोमवती अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या मुळांना जल अर्पण केल्यास ब्रह्मा, विष्णू आणि भगवान शिव या देवांची कृपा प्राप्त होते. ही अमावस्या श्रावण महिन्यात येत असल्याने या शुभ तिथीला भगवान शिवासोबत माता पार्वतीची विशेष पूजा करावी. सोमवती अमावस्येच्या दिवशी दुधात काळे तीळ टाकून शिवलिंगाला अभिषेक करावा.

Leave a Comment