अधिक श्रावण महिन्यात करा ‘ही’ स्वामींची विशेष सेवा; सर्व अडचणी होतील दूर!

मित्रांनो श्रावण महिना म्हणजेच भोले नाथांचा महिना मानला जातो आणि या महिन्यांमध्ये अनेक व्रत, उपवास, पूजाविधी केली जातात. म्हणजे श्रावण महिना हा खूपच पवित्र महिना मानला जातो आणि भोलेनाथांचा कृपाशीर्वाद प्राप्त करण्यासाठी ते आपल्यावर प्रसन्न होण्यासाठी आपण अनेक विविध उपाय पूजा विधि करतच असतो. तर यावर्षी 18 जुलैला श्रावण महिना सुरुवात होणार आहे आणि यावर्षी श्रावण महिना हा दोन महिन्यांचा असणार.

म्हणजेच 18 जुलैला अधिक श्रावण महिना चालू होणार आहे आणि तो 16 ऑगस्ट पर्यंत असणार आहे आणि नंतर 16 ऑगस्ट पासून निज श्रावण सुरू होईल आणि तो 15 सप्टेंबरपर्यंत असणार आहे. म्हणजेच दोन महिने हा श्रावण महिना असणार आहे. तर या श्रावण महिन्यामध्ये आपण सर्व नियमांचे पालन देखील करायचे आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये मी तुम्हाला स्वामींची अशी एक सेवा सांगणार आहे ही सेवा जर तुम्ही केला तर त्यामुळे स्वामी महाराज पण पूर्ण नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होतील.

त्याचबरोबर तुमच्या सर्व अडचणी देखील दूर होतील. तर श्रावण महिन्यामध्ये तुम्ही अनेक पारायण करू शकता. स्त्रोत वाचन करू शकता किंवा अनेक मंत्रांचा जप देखील करू शकता. परंतु ही सेवा म्हणजेच स्वामींची ही विशेष सेवा जर तुम्ही श्रावण महिना संपूर्ण किंवा अधिक श्रावणात तुम्ही ही सेवा स्वामींची केली तरी यामुळे स्वामी महाराज तुमच्या सर्व जीवनातील अडीअडचणी नक्कीच दूर करतील.

तर तुम्हाला अधिक श्रावणात गीतेचा पंधरावा अध्याय वाचायचा आहे आणि दररोज गीतेचा पंधरावा अध्याय न चुकता तुम्हाला वाचायचा आहे. गीतेचा पंधरावा अध्यायाचे वाचन झाल्यानंतर तुम्हाला श्री सूक्त याचे वाचन एक वेळेस करायचे आहे आणि त्यानंतर तीन माळी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. तर गीतेचा पंधरावा अध्याय तुम्हाला स्वामींच्या नित्यसेवा या पोथीमध्ये अवश्य भेटेल.

तर या तीन गोष्टी तुम्ही दररोज चुकता संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये केला तर यामुळे स्वामी नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होतील. त्याचबरोबर महादेवांचा देखील कृपाशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल. तर अशी ही अधिक श्रावणामध्ये तुम्ही स्वामींची विशेष सेवा केली तर तुमच्या जीवनामध्ये खूप आनंदच आनंद होईल.

Leave a Comment