मित्रांनो, आपल्यापैकी बरेच जण हे श्रावण सोमवारचे उपवास करीत असतात. तर महादेवांचा कृपा आशीर्वाद आपल्यावर प्राप्त होण्यासाठी आपण महादेवांचे व्रत उपवास करून तसेच विधिवत पूजा देखील करत असतो. तसेच आपल्या आसपास असणाऱ्या महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन आपण अनेक प्रकारचे अभिषेक तसेच पूजा विधी करीत असतो.
तर यावर्षी श्रावण महिना हा 18 जुलैपासून सुरू होणार आहे आणि हा अधिक श्रावण असणार आहे. 18 जुलैला अधिक श्रावण सुरू होऊन तो 16 ऑगस्टपर्यंत असणार आहे. म्हणजेच एक महिन्यांचा हा अधिक श्रावण असणार आहे आणि त्यानंतर 17 ऑगस्टला नीज श्रावण सुरू होणार आहे आणि तो 15 सप्टेंबर पर्यंत असणार आहे.
तरी यावर्षी दोन महिन्यांचा श्रावण महिना असणार आहे. तर आपल्यापैकी बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की आम्ही श्रावण सोमवारचे व्रत हे कधीपासून करावे? म्हणजेच दोन महिने हे व्रत करावे का? तुम्ही भगवान महादेवांचे सोमवारचे व्रत करणार असाल तर तुम्ही ते अधिक श्रावण मधील केले नाही तरीही चालतील. तर तुम्ही ते निज श्रावणातील जे सोमवार आहे ते सोमवार करायचे आहेत.
तर पहिला श्रावणी सोमवार हा 21 ऑगस्ट असणार आहे. दुसऱ्या श्रावण सोमवार हा 28 ऑगस्टला तर तिसरा सोमवार 4 सप्टेंबर तर चौथा सोमवार हा 11 सप्टेंबरला असणार आहे. तर असे हे चार श्रावणी सोमवार असणार आहेत आणि तुम्ही ते नीज श्रावणातील करायचे आहेत. अधिक श्रावण महिन्यातील सोमवारची व्रत केले नाही तरीही चालते.
तर अशा प्रकारे तुम्ही महादेवांचा कृपा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी या श्रावण महिन्यात अवश्य व्रत करा. यामुळे महादेवाचा कृपाशीर्वाद नक्कीच तुमच्यावर होईल.