स्वामींची ‘ही’ एकच सेवा तुम्हाला जगातील सर्व सुख देईल!

मित्रांनो, आपल्यापैकी बरेचजण हे स्वामी समर्थ यांचे भक्त आहेत. स्वामी आपल्या प्रत्येक अडचणींमध्ये आपल्या पाठीशी उभे राहतात आणि त्या अडचणीतून आपल्याला बाहेर काढतात असा विश्वास देखील भक्तांचा आपल्या स्वामींवर असतो. त्यामुळे भक्त हे अगदी मनापासून स्वामींची सेवा करण्यात मग्न असतात.

तर मित्रांनो प्रत्येकाला आपल्या मनामध्ये काही ना काही इच्छा असते. तसेच अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना देखील आपल्याला करावा लागत असतो. तसेच काहीना आर्थिक समस्या असतात. आरोग्याच्या बाबतीत काही समस्या असतात. तर मित्रानो स्वामींची ही सेवा जर तुम्ही केली तर यामुळे तुमच्या सर्व अडचणी दूर होऊन तुम्हाला त्या अडचणीतून स्वामी मार्ग दाखवतील आणि तुम्हाला सर्व सुख प्राप्त होईल. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील.

तुम्हाला मी स्वामी समर्थांची एक विशेष सेवा सांगणार आहे. तर ही सेवा नेमकी कोणती आहे? चला तर मग जाणून घेऊया. तर मित्रांनो ही सेवा करीत असताना तुम्हाला श्री स्वामीजवळ दिवसातून एक वेळेस म्हणजेच सकाळ, दुपार किंवा संध्याकाळ तुम्हाला जमेल त्या वेळेस अगदी स्वामी समर्था समोर शांत बसायचे आहे.

मग तुम्ही देवघर किंवा तुमच्या घरातील एखादी शांत जागा आहे किंवा घरातील एखादा शांत कोपरा जरी असेल तर त्या शांत ठिकाणी तुम्हाला बसायचे आहे. शांत बसल्यानंतर तुम्हाला डोळे झाकून अगदी हळुवारपणे श्री स्वामी समर्थ! श्री स्वामी समर्थ! हा मंत्रजप करायचा आहे.

तर हा स्वामींचा मंत्र जप तुम्ही कितीही वेळा केला तरीही चालतो. अगदी तुम्ही न मोजता तुम्हाला जितका वेळ करता येईल तितका वेळ तुम्ही स्वामी समर्थांचा जप म्हणजे स्वामींचे नामस्मरण तुम्हाला करायचे आहे.

परंतु मित्रांनो तुम्ही ज्या वेळेस स्वामींचे नामस्मरण करता त्यावेळेस कोणत्याही प्रकारचे विचार आपल्या मनामध्ये आणायचे नाही. तसेच कोणत्याही प्रकारची एखादी चिंता अजिबात आपल्या मनामध्ये येता कामा नये. तुम्ही जे बोलताय त्या आवाजावर लक्ष द्या. आपल्या श्वासावर लक्ष द्या किंवा तुम्ही स्वामी समर्थांचा जप कसा करत आहत त्या ओठांकडे लक्ष द्यायला शिका म्हणजे तुमच्या मनात दुसरं काहीच येणार नाही.

मित्रांनो तुम्हाला रात्री जेवण झाल्यावर किंवा झोपेच्या आधी थोडा वेळ निवांत भेटतो. त्यावेळेस देखील तुम्ही स्वामींचे नामस्मरण केले तरी चालते. एखादी अगरबत्ती तुम्ही आपल्या घरामध्ये लावायची आहे. त्यामुळे आपल्या घरातील वातावरण प्रसन्न राहील आणि अशा वातावरणात तुम्ही स्वामींचे नामस्मरण जर केले तर तुम्हाला जे काही टेन्शन, संकट आहेत जो काही त्रास असतो तो सर्व त्रास निघून जाईल.

तुम्ही नेहमी आनंदी राहाल व सर्व काही सकारात्मक विचार तुमच्या मनामध्ये तसेच डोक्यामध्ये येत राहतील. तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या सर्व पूर्ण होतील. तर मित्रांनो स्वामी समर्थाची ही सेवा तुम्ही अवश्य करून पहा. तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये फरक झालेला नक्की जाणवेल.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment