वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या कुंडलीत अनेक शुभ आणि अशुभ योग तयार होत असतात. कुंडलीतील हे योग आपल्या आयुष्य बदलण्याची ताकद ठेवतात. गरीब माणसं रातोरात श्रीमंत होऊ शकतो, तर श्रीमंत माणूस एका झटक्यात कंगाल होऊ शकतो, असं ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ सांगतात. या योगामधील एक अशुभ योग आहे तो म्हणजे केमद्रुम योगा.
चंद्र हा मनाचा कारक असून तो कुंडलीत शुभ स्थितीत असेल तर तीन शुभ योग तयार होतात. सनफा, दुर्धारा आणि चंद्र अनफा…आणि हाच चंद्र अशुभ स्थितीत असेल तर केमद्रुम योग तयार होतो . जेव्हा कुंडलीत चंद्राच्या दोन्ही बाजूला कुठलाही ग्रह नसेल तर केंद्रम योग जुळून येतो. या अशुभ योगामुळे व्यक्तीला मानसिक समस्यांपासून आर्थिक फटका बसतो.
मीन, वृश्चिक आणि कर्क राशींसाठी केमद्रुम योग अतिशय घातक असतो. या लोकांच्या आयुष्याला ग्रहण लागतं. ज्योतिषशास्त्र तज्ज्ञांनुसार जन्म कुंडलीमध्ये केमद्रुम योग दोष असता. त्यामुळे अशा कुंडलीत अन्य राजयोग असूनसुद्धा ते चांगले परिणाम देत नाहीत.
चंद्र भगवान शिवाशी संबंधित आहे. त्यामुळे भगवान शंकराची पूजा करा आणि त्यांना दररोज पाण्याने किंवा गाईच्या दुधाने अभिषेक करा.
सोमवारी उपवास ठेवा. आठवड्याच्या दर सोमवारी शंकराला रुद्राभिषेकासोबत || ॐ सौं सौमाय नमः ||मंत्राचा जप करा.
सोमवारी पांढऱ्या वस्तू म्हणजे तांदूळ, दूध, पांढरी फूलं, वस्त्र, कापूर, मोती, रत्नचे दान करा.
घरामध्ये कनकधारा यंत्र स्थापन करा. दररोज कनकधारा स्तोत्राचे पठण करा. चांदीच्या अंगठीत मोती रत्न घालून शुक्ल पक्षातील सोमवारी धारण करा.
महिन्यातील दर पौणिमेला उपवास करा. घरामध्ये दक्षिणावर्ती शंख लावा. त्यात नियमित पाण्याने भरून महालक्ष्मीच्या मूर्तीला अभिषेक करा आणि सूर्यदेवालाही अर्घ्य द्या.