करा ‘हा’ उपाय, कोलेस्ट्रॉल ते केस गळतीच्या समस्येपासून मिळेल मुक्ती!

धान्याचे पाणी तयात करण्यासाठी तुम्ही एक चमचा धने, एक कप पाण्यामध्ये भिजत घाला आणि सकाळी उठल्यावर ते पाणी प्या.

धने हे व्हिटॅमिन के, सी आणि ए यासारख्या जीवनसत्वांनी समृद्ध आहेत. नियमित धान्याचे पाणी प्यायल्याने केस गळती, केस तुटणे सारख्या समस्या दूर होतात.धने पचनक्षमता वाढवण्यासाठी फायदेशीर ठरतात. सकाळी धान्याचे पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते आणि वजन कमी करण्यासही फायदा होतो.

शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढल्यामुळे शरीरावर विपरीत परिणाम होतात. तेव्हा धान्याचे पाणी शरीरातील वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यावर प्रभावित ठरते.धान्याचे पाणी डायबिटीज म्हणजेच मधुमेहावर देखील गुणकारी आहे. रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी याचा उपयोग केला जातो.

धान्याचे पाणी प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत करते. कारण ते अँटिऑक्सिडंट्स शरीरातील फ्री रॅडिकल्स कमी करण्यास मदत करतात. धान्यामध्ये भरपूर प्रमाणात लोह असते. तसेच त्यामध्ये अँटी-फंगल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. सकाळी धान्याचे पाणी प्यायल्याने त्वचा चमकदार आणि मुलायम होते.

Leave a Comment