पितरांच्या आशीर्वादाने कुटुंब आणि घराची भरभराट होते, पण पितरांचा कोप झाल्यास अनेक पिढ्यांना पितृदोषाचा फटका सहन करावा लागतो असा समज आहे. अशा स्थितीत काही उपाय केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळू शकते आणि घरात सुख परत येऊ शकते.त्यासाठी काय उपाय करावे लागतात हे आज आपण जाणून घेणार आहोत.
तर कुंडलीत पितृदोष असल्यास व्यक्तीला जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. कधी कधी केलेलं कामही बिघडतं. व्यवसायापासून नोकरीपर्यंत तोटा होऊ लागतो.
घरातील पितृदोषामुळे खूप प्रयत्न करूनही दाम्पत्याला संततीचे सुख मिळत नाही. किंवा जन्मलेली मुले मंद, अपंग इ. काही वेळा मूल जन्माला येताच त्याचा मृत्यू होतो. या चिन्हांवरून घरात पितृदोष असल्याचे दिसून येते.
यामुळे घरात राहणाऱ्या लोकांमध्ये कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून मारामारी, भांडणे होत असतात. घरात उपस्थित सदस्यांपैकी एक ना एक आजारी पडतो. वैवाहिक जीवनात अडथळा येतो. कुटुंबालाही अपघातांना सामोरे जावे लागते. या सर्व लक्षणांवरून घरात पितृदोष असल्याचे दिसून येते.
जर तुमच्या कुंडलीत पितृदोष असेल तर पूर्वजांचा फोटो दक्षिण दिशेला लावा. यासोबत रोज पुष्पहार अर्पण करून त्यांचे स्मरण करावे. दुपारी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे. यासोबतच फुले, अक्षत, दूध, गंगाजल आणि काळे तीळही अर्पण करून पितरांचे स्मरण करावे.
रोज संध्याकाळी दक्षिण दिशेला दिवा लावावा. रोज दिवा लावणे शक्य नसेल तर पितृपक्षाच्या वेळी जरूर लावा. पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी गरीब मुलींचे लग्न लावा. कुणाच्या लग्नात मदत केल्यानेही पितृदोष दूर होतो.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.